कोकण

चालक पदाच्या ४५ उमेदवारांची दांडी

CD

पोलिस भरतीत ४५ उमेदवारांची दांडी
चालक पदासाठी चाचणी ; ११० उमेदवार उपस्थित
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : जिल्हा पोलिस भरती २०२४-२५ साठी काल ( ता. ११) वाहनचालक पदासाठी कौशल्य चाचणी घेण्यात आली. यामध्ये एकूण १५५ उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी ११० उमेदवार हजर राहिले. ४५ उमेदवारांनी या चाचणीसाठी दांडी मारल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हा पोलिसदलामार्फत चालक, पोलिस शिपाई भरतीअंतर्गत वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी काल झाली. या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल ( बाफना मोटर्सजवळ, एमआयडीसी, मिरजोळे, ता. जि. रत्नागिरी) येथे आयोजित करण्यात आली होती. ही चाचणी सुरळीत पार पडावी यासाठी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित राहून वाहन चालवून चाचणी मार्गाची पाहणी केली. तसेच या प्रक्रियेवेळी आवश्यक असलेल्या सुरक्षा, वाहतूक व्यवस्था तसेच उमेदवारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांबाबत संबंधित अधिकारी व अंमलदारांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT