कोकण

सावंतवाडीत १३ पासून ''लोक-सिंधू'' महोत्सव

CD

सावंतवाडीत १३ पासून
‘लोक-सिंधू’ महोत्सव
१५ ला समारोप : ‘लोकमान्य’तर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीच्या वतीने येथील ‘माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’च्या परिसरात १३ ते १५ मार्च या कालावधीत भव्य ‘लोक-सिंधू महोत्सवा’चे आयोजन केले आहे.
याचे उद्घाटन माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून, सिंधुदुर्गच्या तत्कालीन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या महोत्सवातून स्थानिक संस्कृती आणि कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात मनोरंजनासोबतच विविध स्पर्धा आणि कार्यशाळांची रेलचेल असेल. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ''सिंधू सुंदरी'' फॅशन शो आणि ‘खेळ पैठणीचा’ हे कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहेत. दुसऱ्या दिवशी लहान मुलांसाठी मॅजिक वर्कशॉप, मॉकटेल मेकिंग आणि केक डेकोरेशन अशा नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन केले असून, रात्रीच्या सत्रात ''देवधून'' लाईव्ह बँडच्या सादरीकरणाने सोहळ्याची रंगत वाढणार आहे.
महोत्सवाचा समारोप १५ मार्चला प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र यांच्या सुश्राव्य ''लाईव्ह कॉन्सर्ट''ने होणार आहे. शेवटच्या दिवशी फॅन्सी ड्रेस आणि नृत्य स्पर्धांचे आयोजन केले असून, चविष्ट ''फूड फेस्टिव्हल'' हे या महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य असणार आहे. या सांस्कृतिक सोहळ्याचा आणि स्नेहबंधाचा आनंद घेण्यासाठी सावंतवाडीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमान्य सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑपरेशन टायगर! काँग्रेसला तोंडघशी पाडणारा उमेदवार अखेर शिंदेसेनेत; राजकीय वर्तुळात खळबळ

Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेतून कमर्शियल पायलट बनण्याचा मान, सिद्धी हाडवळेची प्रेरणादायी यशोगाथा..

Pune Accident: क्षणात होत्याचे नव्हते! नीरा-मोरगाव मार्गावर दोन बहिणींचा मृत्यू, ९ वर्षीय भाऊ मृत्यूशी झुंजतोय, भावंडांवर काळाचा घाला..

देवा, बघतोयस ना? सप्ताहात साडे तीन कोटींचा गैरव्यवहार, किशोर महाराज शिवणीकरांसह तिघांवर गुन्हा

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजित दीपके यांनी सांगितली तारीख, दिला मोठा इशारा

SCROLL FOR NEXT