कोकण

रत्नागिरीत घराघरातील ''अन्नपूर्णे''ची कसोटी

CD

इराण-इस्रायल युद्धाच्या झळा.....लोगो

रत्नागिरी जिल्ह्यातील घराघरात अन्नपूर्णेची कसोटी
गॅस सिलिंडर मिळण्यास होतोय विलंब; वितरकांच्या एजन्सीपुढे ग्राहकांच्या रांगा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः जगाच्या एका कोपऱ्यात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता रत्नागिरीतील घराघरांत उमटू लागले आहेत. गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण होण्याच्या भीतीने ग्राहकांकडून मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. ऑनलाईन नोंदणीही वेगाने होत आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर घरोघरी पोचण्यात विलंब होत असून, गृहिणींचे नियोजन कोलमडत आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणावर मर्यादा आल्याने अन्नपूर्णांना कसरत करावी लागणार आहे. .
युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलिंडर मिळण्यास विलंब होत असून, आता महिन्यातून केवळ एकच सिलिंडर उपलब्ध होणार आहे. मोठ्या कुटुंबांमध्ये जिथे गॅसचा वापर अधिक असतो तिथे मोजक्या इंधनात स्वयंपाक करण्याचे कसब महिलांना पणाला लावावे लागत आहे. शासनाकडून काहीसा दिलासा मिळत असला तरी ऐनवेळी गॅस संपला तर पर्यायी व्यवस्था काय? या चिंतेने महिला ग्रासल्या आहेत. संकटावर मात करण्यासाठी रत्नागिरीतील महिलांनी आत्तापासूनच ‘ब’ प्लॅन तयार करण्यास सुरुवात केली आहे. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे अशा महिलांनी पुन्हा एकदा पारंपरिक ‘चुली''कडे धाव घेतली आहे; मात्र, पावसामुळे किंवा अन्य कारणांमुळे लाकूड-शेणी गोळा करणे हे मोठे कष्टाचे काम ठरत आहे. शहरात राहणाऱ्या आणि चूल पेटवणे शक्य नसलेल्या महिलांसाठी ‘इलेक्ट्रिक शेगडी’ चा पर्याय उपयुक्त ठरत आहे.
केवळ घरगुतीच नव्हे तर व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठाही विस्कळीत झाल्याने हॉटेल व्यवसाय संकटात सापडला आहे. घरात गॅस नसेल तर बाहेरून मागवू, हा पर्यायही आता धूसर झाला आहे कारण, अनेक छोटी हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे मूलभूत गरज भागवण्यासाठी नेमके काय आणि कसे शिजवायचे, याचे गणित मांडणे अनिवार्य झाले आहे.
-----
कोट १
एखादी आपत्ती ही इष्टापत्ती असते. निसर्गाचे चक्र सुरू होऊन संपत असतं. त्यानुसारच आता हे जे संकट निर्माण झालेलं आहे यातून बाहेर पडताना मला शक्य असणारा मी चुलीचा मार्ग अवलंबेन. बाकीच्या गृहिणींनीही त्यांना जितकं जमेल तितकं नियोजन आतापासून करावं, असं मी सांगेन. गाडीसाठीही इंधन लागतं तेव्हा घराबाहेर पडताना शक्य तितकं चालत आणि सार्वजनिक वाहनांचा वापर हाही उपाय मी अंमलात आणेन.

- संध्या सप्रे, शिक्षिका
---------------
कोट २

सध्यातरी गॅस उपलब्ध होत आहे; मात्र गरज पडल्यास विजेवर चालणारी शेगडी, पाणी तापवण्यासाठी विजेचा हीटर यांचा वापर करावा लागणार आहे. गॅसचा वापर कमी करण्यावर भर दिला पाहिजे. भविष्यातील संकट ओळखून आत्तापासूनच पर्यायी मार्ग शोधणे गरजेचे आहे.
- संपदा पेंडसे, गृहिणी
-------------
कोट ३
आमचं कुटुंब मोठं आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर जास्त लागतो; मात्र भविष्यात गॅसची टंचाई निर्माण झाल्यास इलेक्ट्रिकची शेगडी आणि घर असल्याकारणाने चुलीचा वापर हे दोन पर्याय आमच्यासमोर आहेत.
- सोनाली सावंत, रत्नागिरी
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

BAN vs PAK : हा, घे बॉल... कर OUT! पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा जगाने पाहिला... बाद देताच बांगलादेशच्या खेळाडूला भिडला Video Viral

Uttarakhand Travel Guide: हिमालयात लपलेलं स्वर्गासारखं ठिकाण! चोपटा व्हॅलीला का म्हणतात ‘मिनी स्वित्झर्लंड’?

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT