कोकण

वेतोरे येथे रविवारी ''संत तुकाराम बीज''

CD

टुडे पान एक संक्षिप्त

वेतोरे येथे रविवारी
‘संत तुकाराम बीज’
कुडाळ ः वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे-वरचीवाडी येथील गणपती मंदिरात रविवारी (ता. १५) भगवद्भक्ती प्रबोधिनी (सिंधुदुर्ग) व श्री गणेश बाळ मित्रमंडळ (वेतोरे-वरचीवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत तुकाराम बीज उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता नारदमूर्ती पूजन, संत तुकाराम महाराज, मूर्ती पूजन, आरती, ९ वाजता मंगलाचरण व पूर्वरंग, १० वाजता कीर्तनचक्री, दुपारी २.३० वाजता कीर्तनचक्री, सायंकाळी ४ वाजता संत तुकाराम महाराज निर्वाण अभंग गायन, पसायदान व समारोप होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्गनगरीत आज
आरोग्य चिकित्सा
कुडाळ ः जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग, रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊन व सिंधुदुर्ग रोटरी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (ता. १३) सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मधुमेहग्रस्त रुग्णांची जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे नेत्रपटल (डोळ्याचा पडदा) तपासणी मोफत करण्यात येणार आहे. शिबिराचे उद्घाटन सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊन व सुदर्शन आय हॉस्पिटल, सांगली यांची मोबाईल व्हॅन उपलब्ध असणार आहे. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. अनंत दवंगे, डॉ. सई धुरी, मल्लिकार्जुन बडे व डॉ. सुरेश वाघ, प्रणय तेली व राजेश घाटवळ, डॉ. विद्याधर तायशेटे, सचिन मदने व डॉ. प्रशांत कोलते, विनया बाड, नेत्रतज्ज्ञ डॉ. भोसले, सुयश हॉस्पिटल नेत्र विभागप्रमुख डॉ. जयश्री केसरे, सर्व रोटरी क्लबचे अध्यक्ष, सचिव उपस्थित राहणार आहेत. जास्त वर्षे मधुमेहग्रस्त व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग नेत्र विभागप्रमुख डॉ. बाळासाहेब जोशी, रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलचे अध्यक्ष अरुण मालणकर व सचिव दीपक आळवे यांनी केले आहे.

सावंतवाडीत उद्या
राष्ट्रीय लोकअदालत
सावंतवाडी ः सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. १४) सकाळी १० वाजता येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून लोकअदालतीचे आयोजन केले आहे. ज्या पक्षकारांना आपले प्रकरण चर्चेद्वारे मिटवायचे असेल, अशा पक्षकारांनी न्यायालयात उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

पोलिस प्रशिक्षकांची
मुंबईत कार्यशाळा
सिंधुदुर्गनगरी ः महाराष्ट्र पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाजाबाबतचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात व आयुक्तालयात प्रशिक्षक तयार करावयाचे आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील हुशार व होतकरू कर्मचाऱ्यांची निवड करण्यात येऊन त्यांच्यासाठी मंगळवारी (ता. १७) मार्चला राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयात राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ व्याख्याते म्हणून सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, माजी प्रशासकीय अधिकारी मोहन गवस यांना निमंत्रित करण्यात आले आहे. श्री. गवस हे सिडकोचे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रातील अनेक भागात व्याख्याने देऊन कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. याशिवाय आजपर्यंत विभागीय चौकशीची महाराष्ट्रातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची संवेदनशील प्रकरणे हाताळली असून शिस्तभंगविषयक प्रकरणासंदर्भातील नियम व कायदे यामध्ये एक तज्ज्ञ अधिकारी म्हणून त्यांचा महाराष्ट्रात परिचय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT