- ratchl१२२.jpg-
P२६O३०५०३
चिपळूण ः प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देताना कॉंग्रेसचे शिष्टमंडळ.
----
महागाईविरोधात कॉंग्रेस आक्रमक
चिपळूण प्रांत लिगाडे, यांना शिष्टमंडळाकडून निवेदन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ ः देशात सध्या प्रचंड महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे अत्यंत कठीण झाले आहे. केंद्र व राज्य सरकारने घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडर तसेच पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत सातत्याने वाढ करुण सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकला आहे. या दरवाढी विरोधात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने प्रांत अधिकारी आकाश लिगाडे यांना निवेदन दिले.
सरकारच्या सततच्या दरवाढीमुळे कुटुंबाचे मासिक अर्थकारण कोलमडून गेले आहे. शिक्षण फी, घरपट्टी, पाणीपट्टी, वीजबिले यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या महागाईला मोदी सरकार जबाबदार आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात इंधनाच्या किंमती वाढल्या असताना त्याचा भार सर्वसामान्य जनतेवर पडू दिला नव्हता. परंतु सध्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गॅस सिलिंडर व इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून जनतेला महागाईच्या खाईत लोटून आर्थिक कोंडी केली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर १९०० रुपयांच्या पुढे आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने दर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.