कोकण

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे साळीस्ते शाळेत अनावरण

CD

swt138.jpg
30572
साळीस्ते : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा साळीस्ते क्र. १ मध्ये उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना दिलीप तळेकर, गुरुप्रसाद शिंदे, प्रभाकर ताम्हणकर, जितेंद्र गुरव आणि इतर मान्यवर.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
पुतळ्याचे साळीस्ते शाळेत अनावरण
तळेरे, ता. ९ : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही आपली आदरस्थाने आहेत. आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून माजी विद्यार्थ्यांनी एक उत्तम संकल्पना साकारली आहे,’’ असे प्रतिपादन माजी सभापती दिलीप तळेकर यांनी केले.
ते जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा साळीस्ते क्र. १ मध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण तळेकर आणि गुरुप्रसाद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे, साळीस्तेचे सरपंच प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच जितेंद्र गुरव, कणकवलीचे गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, गोपाळ जाधव, पोलीस पाटील गोपाळ चव्हाण, सुरेश साळीस्तेकर, वामन ताम्हणकर, बी. पी. साळीस्तेकर, चंद्रकांत हरयाण, अशोक कोकाटे, मयुरेश लिंगायत, अनंत गुरव, माजी मुख्याध्यापिका पिसे, प्रकाश साळीस्तेकर, प्रभाकर वाडेकर, सचिन लवेकर, कांजीरवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कुंभार, तळेरे शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र पावसकर, मूर्तिकार आयरे, समीर ताम्हणकर, ओमकार गुरव, विशाल वरवडेकर, गजानन रामाणे आणि मुख्याध्यापिका संजना ठाकूर आदी उपस्थित होते.
शाळेने पालक आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून फुलवलेल्या परसबागेचे उपस्थित पाहुण्यांनी विशेष कौतुक केले. यामध्ये विशेषतः कोबीच्या लागवडीचा उल्लेख करण्यात आला. तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर आता ही शाळा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सज्ज झाली असून मान्यवरांनी शाळेला शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक संजना ठाकूर यांनी, तर सूत्रसंचालन वैभव पारधिये यांनी केले. याप्रसंगी ओमकार गुरव, दिलीप तळेकर, गुरुप्रसाद शिंदे, विशाल वरवडेकर, किशोर गवस, प्रभाकर ताम्हणकर यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी श्रीराम विभुते, दिनेश मुद्रस, वैभव कांबळे, प्रसन्ना नारकर, मंगेश कांबळे, संतोष पाष्टे, उदय बासरस्कर, बबन गुरव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: यंदाही मुंबईची तुंबई! ८० ठिकाणी भरणा-या पाण्याचा उपसा करण्यासाठी ५४७ पंप बसविणार

Neeta Ambani: नीता अंबानींच्या घरात रोज बनतात तब्बल ४००० पोळ्या! कारण ऐकून तुम्हालाही बसणार नाही विश्वास; Viral

Latest Marathi News Live Update: बेंगळुरुमध्ये मुसळधार पावसाची हजेरी

Missing Link: खंडाळा घाटातील ट्रॅफिक, अपघात आणि विलंबाला ब्रेक... मेगा प्रोजेक्टला 'मिसिंग लिंक' हे नाव का? कोंडी पूर्णपणे संपेल का?

महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत भव्य परेड! कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल आणि कडक निर्बंध लागू; कुठे अन् कधी?

SCROLL FOR NEXT