कोकण

झेवियरसाठी ‘तो ‘ कॅम्प ठरला आरोग्यदायी

CD

swt139.jpg
30573
देवबाग: यशस्वी शस्त्रक्रिया पार पडलेला झेवियर फर्नांडिस नातेवाईकांसह.

झेवियरसाठी ‘तो’ कॅम्प ठरला आरोग्यदायी
यशस्वी शस्त्रक्रिया: राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अंतर्गत झाली होती तपासणी
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १३:जिल्हा रुग्णालयाच्या वतीने कणकवली येथे आयोजित केलेला मेगा कॅम्प मालवण तालुक्यातील देवबाग येथील ९ वर्षीय झेवियर फर्नांडिस याच्यासाठी आरोग्यदायी ठरला आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत त्याच्यावर हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे.
कणकवली येथे २७ फेब्रुवारीला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मेगा कॅम्प आयोजित केला होता. यात शून्य ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने एकूण ६६ बालकांची तपासणी केली. यावेळी करण्यात आलेल्या ‘२डी इको’र चाचणीत झेवियर याच्या हृदयात दोष असल्याचे निदान झाले.तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, झेवियरला पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सामंजस्य करार झालेल्या मुंबईतील रुग्णालयात पाठवण्यात आले होते. तिथे त्याच्यावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

चौकट
सावंतवाडीत २४ ला मेगा कॅम्पचे आयोजन
उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे २४ ला पुन्हा एकदा मेगा कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ‘किम्स हॉस्पिटल, ठाणे’ येथील तज्ज्ञ डॉक्टरांचा गट उपस्थित राहणार असून, ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची ''२डी इको'' तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

FASTag Annual Pass वार्षिक टोल पास झाला महाग, १ एप्रिलपासून नवे दर लागू

Nashik LPG Supply : नाशिककरानो घाबरू नका! जिल्ह्यात पुरेसा गॅस साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Nutritionist Health Tips: तुम्हाला 35 वर्षानंतरही राहायचंय फिट आणि निरोगी? न्यूट्रिशनिस्टच्या ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

SCROLL FOR NEXT