swt1310.jpg
30567
सावंतवाडीः येथील कळसुलकर शाळेच्या यशस्वी विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शक शिक्षक.
‘सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च’ परीक्षेत
कळसुलकर शाळेचे यश
५३ विद्यार्थ्यांनी पटकावली विविध पदके
सावंतवाडी, ता. १३ : येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचालित कळसुलकर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च’ परीक्षेत आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. दुसरी, तिसरी व चौथीच्या तब्बल ५३ विद्यार्थ्यांनी विविध पदके पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
मुलांना शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची सवय व्हावी, या उद्देशाने सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षा गेली अनेक वर्षे आयोजित केली जाते. यामध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो.
यशस्वी विद्यार्थ्यी असे : इयत्ता चौथी : सुवर्णपदक : धारा कोरगावकर, चैतन्य सावंत व कृष्णा पायशेट. रौप्यपदक: अवनी आवटे, कौशल मसुरकर, सार्थक नाईक, चैत्राली काळे, गार्गी गुंजाळ, रत्नाराम रबारी, श्रेष्ठ कडव, वेद गवस, गार्गी पई, कौस्तुभ पास्ते आणि संकेत परब. कांस्यपदक: तन्वी सरमळकर, शौर्य अपराध, सार्थक वरक आणि हरून सय्यद. इयत्ता तिसरी : सुवर्णपदक: हिमानी कोलगावकर व दर्श पडते.रौप्यपदक: प्रत्युष जाधव, ध्रुव नाडकर्णी, आत्रेया आचार्य, युगराज सावरवाडकर आणि आरोही अरवारी. कांस्यपदक: शिवम नाडकर्णी, श्राव्या परब, देवांश परब, प्रणव धुरी आणि रुद्र शिंदे.
इयत्ता दुसरी : सुवर्णपदक: आर्यन बोळेगावे, स्वरांग गावडे, दीक्षा टिळवे, साईशा देसाई, ईश्वरी मोर्ये, आयुष लुष्टे, ऋग्वेद रणशूर, वेदांश कदम, वेदांत गावडे आणि प्रांजली सोनटक्के. रौप्यपदक: स्वयंम भंडारे, परी जाधव, अर्चना सावंत आणि परिधी कोयंडे.कांस्यपदक: दूर्वा कानसे, वेदांत गिरप, रिद्धी परब, स्पृहा वडार, स्वराली पांगम, आराध्या तुर्केवाडकर, उत्कर्ष मुरकुटे, स्वरा राऊळ आणि सुखम करमळकर.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्री. डी. जी. वरक, स्मिता घाडीगावकर, अमित कांबळे, श्रीमती लोके, स्वरा राऊळ आणि संजना आडेलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.