swt1311.jpg
30568
मळगाव: येथे डॉ. अश्विनी खानोलकर यांना यशवंती धोंडू पटेकर स्मृती पुरस्कार’ कावेरी कासरलकर-मयेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
वाचनामुळेच अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती
कावेरी कासरलकर-मयेकर : बालरोगतज्ज्ञ डॉ. खानोलकर यांना पुरस्कार प्रदान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता.१३: ‘‘महिलांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःसाठी वेळ काढणे ही काळाची गरज आहे. समाजात वावरताना स्वतःची सुरक्षितता आणि एकटेपणाचा सकारात्मक वापर कसा करावा, याचे भान वाचनातून येते. वाचनामुळेच अन्यायाविरुद्ध लढण्याची वैचारिक शक्ती प्राप्त होते,’’ असे प्रतिपादन लेखिका व मानसशास्त्रीय समुपदेशक कावेरी कासरलकर-मयेकर यांनी केले. मळगाव येथील वाचनालयात आयोजित पुरस्कार सोहळ्यात त्या मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरातर्फे ‘कै. यशवंती धोंडू पटेकर स्मृती पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन केले होते. यंदाचा हा मानाचा पुरस्कार प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी मिलिंद खानोलकर यांना प्रदान करण्यात आला. उज्ज्वला खानविलकर-पटेकर पुरस्कृत हा सोहळा नारीशक्तीचा गौरव करणारा ठरला.
‘कात्यायनी’ या पुस्तकाचा संदर्भ देत कासरलकर म्हणाल्या की, स्त्रियांनी कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात मोबाईलचा वापर टाळण्यापेक्षा त्याचा विधायक कामांसाठी वापर करून स्वतःचे व्यक्तिमत्व घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. खानोलकर भावूक झाल्या. त्यांनी यशाचे श्रेय सासरच्या मंडळींना व पतीला दिले. ‘‘वैद्यकीय सेवेतील माझी लहान रुग्ण मुले हाच या पुरस्काराचा खरा भाग आहेत,’’ असे त्यांनी नमूद केले. वाढत्या जंक फूडच्या धोक्याबाबत पालकांना सतर्क करताना त्यांनी मुलांना मोड आलेली कडधान्ये, फळे आणि पालेभाज्या देण्याचा सल्ला दिला. मुलांच्या हातात मोबाईल देण्यायेवजी त्यांना मैदानी खेळ खेळू द्यावे आणि पालकांनी त्यांचे मित्र बनावे, असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.