कोकण

घे भरारी फाऊंडेशन''च्या उपक्रमांना सावंतवाडी प्रतिसाद

CD

swt1312.jpg
30569
सावंतवाडी: येथे घे भरारी फाउंडेशनतर्फे आयोजित दशावतारी नाट्य प्रयोगातील कलाकरांसमवेत मान्यवर.

‘घे भरारी फाऊंडेशन''च्या
उपक्रमांना सावंतवाडी प्रतिसाद
सावंतवाडी, ता. १३ :जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘घे भरारी फाऊंडेशन’ सावंतवाडीच्या वतीने जगन्नाथराव भोसले उद्यानात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महिला व दिव्यांग मुलांचा गौरव, मजेशीर खेळ आणि महिलांनीच सादर केलेल्या दशावतारी नाट्यप्रयोगाने या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
‘साहस प्रतिष्ठान’ संचलित दिव्यांग विकास केंद्रातील मुलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका मोहिनी मडगावकर, सुकन्या टोपले, दीपाली भालेकर, दुलारी रांगणेकर, सुनीता पेडणेकर, नीलम नाईक तसेच सामाजिक कार्यकर्त्या संजना संजू परब, मंगल नाईक-जोशी, पोलीस अधिकारी ज्योती दुधवडकर व प्राजक्ता सावंत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उद्योजक महेश कुमठेकर व दशावतारी कलाकार गौरव शिर्के यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या ‘कृष्णभोजन’ या दशावतारी नाटकात मोहिनी मडगावकर, मेघा भोगटे, वैष्णवी बांदेकर, वंदना मडगावकर, रेखा कुमठेकर यांच्यासह अनेक महिलांनी भूमिका साकारल्या. या नाटकाला वैभव पाटकर, निलेश मांजरेकर व समीर मांजरेकर यांनी संगीतसाथ दिली.
मेघना राऊळ यांनी सुत्रसंचालन केले. याप्रसंगी फाऊंडेशनच्या अध्यक्षा रेखा कुमठेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Watermelon Deaths : कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू? पायधुनीतील घटनेनंतर कलिंगड विक्रीत 50 टक्क्यांनी घट; भीतीपोटी ग्राहकांनी फिरवली पाठ

IPL म्हणजे बिझनेस, मनोरंजन... क्रिकेट नाहीच! काव्या मारनच्या संघातील सदस्याचा मोठा दावा; म्हणाला, इथे खेळाच्या विकासापेक्षा...

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर तहसील येथे चर्मकार समाजाचे निदर्शने करत आंदोलन

Maharashtra Result Day : राज्य मंडळाचा नवा निर्णय; पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना निकालासोबत उत्तरपत्रिकाही मिळणार

Grandson Property Rights India : ... तर आजोबाच्या संपत्तीत नातवाला मिळणार नाही हिस्सा, नवा नियम काय सांगतो ?

SCROLL FOR NEXT