कोकण

सावंतवाडी ‘पंचायत ‘ इमारत उभारणीचे आव्हान

CD

30648
सावंतवाडी ‘पंचायत’ इमारत उभारणीचे आव्हान
रखडलेला प्रकल्प : निर्लेखनासह प्रशासकीय कारभार हलवल्यानंतर प्रक्रिया
रुपेश हिराप : सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ : येथील पंचायत समितीचा कारभार तब्बल चार वर्षांनंतर पुन्हा लोकप्रतिनिधींच्या हाती आला आहे. त्यामुळे, दीर्घकाळ रखडलेल्या पंचायत समितीच्या अद्ययावत इमारतीचे काम पूर्णत्वास नेणे हे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींसमोर मुख्य आव्हान असणार आहे. सुमारे साडेतीन गुंठ्यांत ही तीन मजली इमारत उभी राहणार असून, सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या इमारतीचे निर्लेखन आणि प्रशासकीय कारभार अन्यत्र हलवल्यानंतर या कामाला प्रत्यक्ष गती मिळणार आहे.
पंचायत समितीची जुनी इमारत धोकादायक झाल्यानंतर, गेल्या सहा-सात वर्षांपासून येथील कारभार शिरोडा नाका येथील जिल्हा परिषदेच्या गोडावूनमध्ये सुरू आहे. सुरुवातीला नव्या इमारतीच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला होता; मात्र शिरोडा नाका येथील जिल्हा परिषदेच्या जागेतच नवीन इमारत उभारण्याचे निश्चित झाल्याने हा प्रश्न सुटला. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया आणि प्रशासकीय मंजुऱ्या मिळवण्यात काही काळ गेला. सद्यस्थितीत इमारतीला मंजुरी मिळाली असली, तरी जुन्या इमारतीचे निर्लेखन न झाल्याने काम रखडले होते. आता निर्लेखन प्रक्रिया पूर्ण होऊन इमारत पाडण्याचे टेंडरही निघाले आहे.

१४ कोटी ५० लाखांचे बजेट
तब्बल १४ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून ही अद्ययावत तीन मजली इमारत साकारली जाणार आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्याने या कामात फारशी हालचाल झाली नव्हती. आता नवनिर्वाचित सभापती, उपसभापती आणि सदस्यांवर हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. आपल्या कार्यकाळात या इमारतीचे काम पूर्ण करून तिचा प्रारंभ केल्यास, ते एक मोठे यश मानले जाईल.
सध्या गोडावूनमध्ये असलेला प्रशासकीय कारभार चितारआळी येथील जिल्हा परिषदेच्या तालुका शाळेत हलवण्याच्या हालचाली सुरू असून, त्या संदर्भात पाहणीही पूर्ण झाली आहे. जागा रिकामी होताच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चौकट
असा मिळणार निधी
या इमारतीच्या मंजुरीसाठी आमदार दीपक केसरकर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. अनेक अडचणींवर मात करून निधी मंजूर केला आहे. खर्चाचे स्वरूप असे :
मुख्य इमारत: ७ कोटी ४६ लाख १४ हजार रुपये
इलेक्ट्रिसिटी व लिफ्ट : ८२ लाख रुपये
इंटिरिअर व फर्निचर : ८५ लाख ८० हजार रुपये
पाणीपुरवठा व स्वच्छता: ७४ लाख रुपये
इतर खर्च : प्लॉट डेव्हलपमेंट (२० लाख), कंपाउंड वॉल (१८ लाख), अंतर्गत रस्ते (१५ लाख), रेन वॉटर हार्वेस्टिंग (१० लाख), पार्किंग शेड व फ्लॅग पोस्ट (१० लाख).

कोट
सावंतवाडी पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे काम येत्या काही दिवसांतच सुरू होणार आहे. त्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू असून, ही इमारत शक्य तितक्या लवकर उभी करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
- सुहास टेमकर, उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग

कोट
पंचायत समितीच्या इमारतीचे काम पूर्ण करणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे. सर्वांना सोबत घेऊन आम्ही या कामावर लक्ष देऊ. यासाठी आमदार दीपक केसरकर तसेच महायुतीतील सर्व नेत्यांचे सहकार्य घेतले जाईल.
- सुस्मिता जाधव, सभापती, पंचायत समिती, सावंतवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT