कोकण

भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्षपदी आदिती गुडेकर

CD

भाजप महिला मोर्चा
तालुकाध्यक्षपदी गुडेकर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः भारतीय जनता पक्षाच्या चिपळूण तालुका महिला मोर्चा अध्यक्षपदी भिले गावच्या सरपंच आदिती गुडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. खेर्डी येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, तालुकाध्यक्ष विनोद भुरण, जिल्हा विशेष निमंत्रित सदस्या स्वप्ना यादव यांच्या हस्ते गुडेकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
तालुक्यातील भिले गावच्या सरपंच गुडेकर या प्रभावीपणे काम करत आहेत. त्यांच्या कामकाजासाठी दखल घेत महिला मोर्चा तालुकाध्यक्षपदी नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली. निवडीनंतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करू, अशी ग्वाही गुडेकर यांनी दिली. या वेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत शहा, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, गटनेते शशिकांत मोदी, महिला मोर्चा शहराध्यक्ष तसेच नगरसेविका रसिका देवळेकर, वैशाली निमकर, संदीप भिसे, अंजली कदम, सरपंच सुगंधा माळी, प्रकाश पाथरूड, बाळा दाते, कुणाल आंबेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT