कोकण

कसोपमध्ये ''बीएसएनएल''चा खोळंबा

CD

कसोपमध्ये ‘बीएसएनएल’चा खोळंबा
ग्रामस्थांचे हाल ; समस्या न सोडवल्यास आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः रत्नागिरी तालुक्यातील कसोप गावातील बीएसएनएल टॉवरची रेंज भंडारवाडी, तेलीवाडी व कुणबीवाडी या भागात पूर्णपणे गायब असल्याने ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्येची दखल घेत कसोप ग्रामस्थांच्यावतीने ॲड. गौरव शेलार यांनी बीएसएनएलच्या रत्नागिरी शाखा व्यवस्थापकांना निवेदन दिले.
कसोप गावात बीएसएनएलचा टॉवर उपलब्ध असूनही भंडारवाडी, तेलीवाडी आणि कुणबीवाडी या प्रमुख वस्त्यांमध्ये पुरेसे नेटवर्क मिळत नाही. कॉल सुरू असताना अचानक कट होणे, हायस्पीड डाटा न मिळणे आणि मोबाईल असूनही ‘आउट ऑफ कव्हरेज’ राहणे यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नेटवर्कच्या समस्येमुळे ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, लॅपटॉपवर काम करणाऱ्या व्यावसायिकांना नेटवर्क शोधत बसावे लागत आहे. डिजिटल इंडियाच्या युगात ऑनलाईन व्यवहार आणि महत्त्वाची शासकीय कामे करण्यासाठी ग्रामस्थांना नेटवर्क असलेल्या ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे. रेंज नसल्यामुळे तातडीच्या प्रसंगी कोणाशीही संपर्क साधणे कठीण झाले आहे.
यापूर्वी दोनवेळा स्थानिक स्तरावर अधिकाऱ्यांना रेंजच्या समस्येबाबत माहिती देण्यात आली होती; मात्र कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे अखेर ॲड. शेलार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी थेट जिल्हा कार्यालयात धाव घेतली. परिस्थिती लक्षात घेऊन टॉवरची क्षमता वाढवणे, तांत्रिक बदल करणे किंवा आवश्यकतेनुसार बूस्टर बसवून पूर्ण दाबाने रेंज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ‘येत्या सात दिवसांत तांत्रिक पथक पाठवून समस्येचे निराकरण न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल,’ असा इशारा ॲड. शेलार यांनी दिला आहे.
निवेदन स्वीकारल्यानंतर अधिकारी सचिन कांबळे यांनी यावर तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे. या वेळी ॲड. शेलार यांच्यासोबत ॲड. समीर झिमण, ॲड. विश्वजित पवार, ॲड. चेतना जाधव आणि ॲड. जितेंद्र पवार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : केंद्र सरकारचे लक्ष पुरवठा साखळीवर

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

SCROLL FOR NEXT