कोकण

-दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७ लाख

CD

- rat१३p४.jpg-
२६O३०५९५
किरण सामंत
----
राजापूर दिवाणी न्यायालयासाठी ७७ लाख
किरण सामंत ः लवकरच कामास होणार सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ : राजापूर येथील दिवाणी न्यायालयाच्या मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर तसेच पहिल्या मजल्यावरील टेरेसवर पत्र्याची शेड उभारण्यासाठी राज्यशासनाकडून ७७.६३ लाख रुपयांची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली आहे. या कामासाठी राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
राजापूर दिवाणी न्यायालयाच्या इमारतीत पावसाळा आणि उन्हाळ्यात विविध अडचणी निर्माण होत होत्या. न्यायालयीन कामकाजासाठी येणारे वकील, कर्मचारी आणि नागरिकांना संरक्षण मिळावे तसेच इमारतीचा उपयोग अधिक सुकर व्हावा या उद्देशाने तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील टेरेसवर पत्र्याची शेड उभारण्याची मागणी करण्यात आली होती.
या मागणीची दखल घेत आमदार किरण सामंत यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत राज्यशासनाकडून ७७.६३ लाख रुपयांची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. या निधीमुळे न्यायालयाच्या इमारतीतील सुविधा अधिक सक्षम होणार असून वकील, कर्मचारी तसेच न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, राजापूर तालुक्याच्या विकासासाठी आमदार सामंत विविध कामांसाठी सातत्याने निधी उपलब्ध करून देत असल्याने तालुक्याच्या विकासाला चालना मिळत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर गुन्हेगारी छाया! २२७ नगरसेवकांपैकी कितींवर गुन्हेगारी खटला दाखल? ADR अहवालात धक्कादायक खुलासा

Crime: 'अहो ऐका ना, पकोडे आणता का'? खाण्याच्या बहाण्याने पतीला बसमधून उतरवले, नंतर पत्नीने प्रियकरासोबत नको ते केले

शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर होणार, बळीराजाच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध; कृषी राज्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिर गाभारा दर्शन चार दिवस राहणार बंद; मंदिर प्रशासनाकडून माहिती

Latest Marathi News Live Update : संगमनेरमध्ये शेअर मार्केटच्या नावाने 62 जणांची फसवणूक

SCROLL FOR NEXT