- ratchl१३२.jpg-
२६O३०६०७
चिपळूण ः स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी.
----
नवी मुंबईचा ‘लॉस्ट फ्रॉम लाईट’ प्रथम
‘हॅकथॉन कोडबिट्स’ स्पर्धा ; घरडा इन्स्टिट्यूटचे आयोजन, देशभरातील ४८ विद्यार्थीसंघांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ : घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये संगणक विज्ञान व अभियांत्रिकी तसेच संगणक अभियांत्रिकी विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील २४ तासांचे हॅकथॉन ‘कोडबिट्स ४.०’ हे ११ व १२ मार्च रोजी उत्साहात पार पडले. स्पर्धेत नवी मुंबई येथील इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ‘लॉस्ट फ्रॉम लाईट’ या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील एकूण ४८ विद्यार्थीसंघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
हॅकथॉनमध्ये विद्यार्थ्यांना सामाजिक व औद्योगिक समस्यांवर आधारित समस्या विधान देण्यात आले होते. हेल्थकेअर तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान, शिक्षणातील डिजिटल उपाय आणि पर्यावरण संरक्षण या महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांनी २४ तास अखंडित परिश्रम घेत नावीन्यपूर्ण तांत्रिक उपाय विकसित केले. या प्रक्रियेदरम्यान आयडिया जनरेशन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, मशिन लर्निंग मॉडेल डिझाईन तसेच मोबाइल व वेबअॅप्लिकेशन डेव्हलपमेंट या क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.
या स्पर्धेदरम्यान सहभागी संघांनी अनेक नावीन्यपूर्ण आणि उपयुक्त प्रकल्प सादर केले. तज्ज्ञ परीक्षक नंदिनी सिंग आणि कैलास शर्मा यांनी प्रकल्पांचे मूल्यमापन केले. तांत्रिक गुणवत्ता, नवोपक्रमशीलता, प्रत्यक्ष वापरयोग्यता आणि सादरीकरण कौशल्य या निकषांवर परीक्षण करण्यात आले. स्पर्धेत ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या ‘इटरेटिव्ह बाईट्स’ संघाने द्वितीय तर फादर रॉड्रिग्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ‘अँटी प्लेसमेंट’ संघाने तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्या संघांना उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील, एआयएमएल विभागप्रमुख प्रा. सचिन लाटकर, संगणक विभागप्रमुख प्रा. ज्योती खालकर तसेच परीक्षक नंदिनी सिंग व कैलास शर्मा यांच्या हस्ते अनुक्रमे २५ हजार, २० हजार आणि १५ हजार रुपये रोख पारितोषिके व प्रशस्तिपत्रके प्रदान करण्यात आली.
या राष्ट्रीय स्तरावरील हॅकथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, विभागप्रमुख, समन्वयक डॉ. अरुण ढंग, प्रा. श्रद्धा गोपाळ, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. ‘कोडबिट्स ४.०’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, नवोपक्रम आणि तांत्रिक कौशल्यांना चालना मिळाली असून, भविष्यातही अशा तांत्रिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
---
कौशल्य विकसित होण्यास मदत
हॅकथॉनमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समस्यांवर तांत्रिक उपाय शोधण्याची संधी मिळाली असून, त्यांच्या सर्जनशीलता, नवोपक्रमशील विचारसरणी, समस्या सोडवण्याची क्षमता आणि टीमवर्क कौशल्य विकसित होण्यास मदत झाली. २४ तासांच्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सातत्यपूर्ण सहभाग नोंदवत अनेक नावीन्यपूर्ण कल्पना साकार केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.