कोकण

कोंडिवळे-गोतावडे शाळेला आदर्श शाळा पुरस्कार

CD

rat१३p५.jpg-
२६O३०६०३
राजापूर : कोंडिवळे गोतावडे शाळा.
-----
कोंडिवळे-गोतावडे शाळेला पुरस्कार
शाळाबाह्य मुलांच्या गुणवत्तेवर भर; दहा विद्यार्थ्यांना पदक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : जिल्हा परिषद रत्नागिरीचा २०२५-२६ साठी कनिष्ठ प्राथमिक शाळा गटातून राजापूर तालुक्यातील मंदरूळ केंद्रातील शाळा कोंडीवळे गोतावडेवाडी या शाळेला पुरस्कार जाहीर झाला आहे. शाळेच्या भौतिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकास उंचावण्यासाठी येथील शिक्षकांनी शाळाबाह्य स्पर्धा परीक्षांतून मुलांची अतिशय उत्कृष्ट गुणवत्ता निर्माण केली आहे.
शाळेतून मागील वर्षी रत्नागिरी टॅलेंट सर्च, चौथी परीक्षेत राजापूर तालुक्यातून ओम उदय गोतावडे हा विद्यार्थी प्रथम आला. मंथन, मॅथ्स ऑलिम्पियाड राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत मुलांनी गुणवत्ता प्राप्त केली आहे. यावर्षीही रंगोत्सव, मॅथ्स ऑलिम्पियाड, सिंधुरत्न, ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेतून जवळपास १२ पैकी १० मुलांना पदक प्राप्त आहेत. विद्यार्थी गुणवत्ता विकासाला प्राधान्य दिल्यामुळे शाळेची प्रगती दिसून येत आहे. प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर पालक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थांची मोलाची साथ मिळत आहे. या वाटचालीत संजय कुळये व दादासाहेब देसाई यांची साथ मोलाची लाभली आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्यातील संवेदनशीलता विकसित व्हावी, यासाठी शाळेत सहशालेय उपक्रमांसोबत वेगवेगळे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. यामध्ये पाखरांसाठी चिमणचारा, ऑक्सिजन पार्क, माणुसकीचा खोका, प्लास्टिकमुक्त शाळा, इकोब्रिक्स, एक मूल एक झाड, एक मूल एक म्हण, रोज एक अक्षरावरून इंग्रजी शब्द, रोज पाढे, ज्ञानकुंभसारख्या उपक्रमांसोबत इतर अनेक छोटे-मोठे उपक्रम सातत्याने घेऊन अध्ययन अध्यापनात रंजकता आणली आहे.
शाळेच्या या यशाबद्दल राजापूर गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले, केंद्रप्रमुख सोगम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अंजनी लाड, सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ, ओणी नूतन विद्यामंदिरचे संस्थाध्यक्ष वासुदेव तुळसणकर, कार्यवाह संसारे, कोंडीवळे गावच्या ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर गुन्हेगारी छाया! २२७ नगरसेवकांपैकी कितींवर गुन्हेगारी खटला दाखल? ADR अहवालात धक्कादायक खुलासा

Crime: 'अहो ऐका ना, पकोडे आणता का'? खाण्याच्या बहाण्याने पतीला बसमधून उतरवले, नंतर पत्नीने प्रियकरासोबत नको ते केले

शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर होणार, बळीराजाच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध; कृषी राज्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिर गाभारा दर्शन चार दिवस राहणार बंद; मंदिर प्रशासनाकडून माहिती

Latest Marathi News Live Update : संगमनेरमध्ये शेअर मार्केटच्या नावाने 62 जणांची फसवणूक

SCROLL FOR NEXT