कोकण

पतंजलि योग समितीच्या महिलांचा सन्मान

CD

- rat१३p१०.jpg-
P२६O३०६१३
रत्नागिरी ः येथील योगभवनात आयोजित कार्यक्रमात योग विषयावर माहिती देताना स्मिता पुराणिक. सोबत नीता साने, अनघा जोशी, मीनाक्षी वझे आदी.
-----
‘पतंजली योग समिती’च्या महिलांचा सन्मान
महिलादिनानिमित्त कार्यक्रम; ‘सकाळ’चा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : महिला पतंजली योग समिती, हिंदू जनजागृती समिती आणि ‘सकाळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने मिरजोळे येथील योगभवनात गुरूवारी (ता. १२) जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिलांचा सन्मान करण्यात आला.
कुवारबाव येथील महिला पतंजली योग समितीच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी महिला पतंजली योग समिती रत्नागिरीच्या महामंत्री नीता साने, अनघा जोशी (माजी जिल्हा प्रभारी व कोषाध्यक्ष), हिंदू जनजागृती समितीच्या मीनाक्षी वझे, ‘सकाळ’चे उपसंपादक राजेश कळंबटे, वितरणचे प्रतिनिधी अमोल डोंगरे उपस्थित होते. या प्रसंगी स्मिता पुराणिक यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट केले तर राजश्री कवितके यांनी आदर्श मुलींची जडणघडण या विषयावर मार्गदर्शन केले. वंदना गहिसास यांनी गीताज्ञान व्यावहारिक जीवनात कसे उपयुक्त ठरते, यावर विचार मांडले तर हिमानी कुलकर्णी-दामले यांनी आहारविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी नेहा कुलकर्णी यांनी अल्पोपाहाराची व्यवस्था केली. नीता विनय साने यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT