कोकण

घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी देणार

CD

घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी देणार
सिद्धेश कदम ः नगराध्यक्ष सकपाळ यांनी घेतली भेट
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः चिपळूण पालिकेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी काल (ता.१२) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची मुंबईत भेट घेतली. या वेळी चिपळूण पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आवश्यक निधी मंजूर करावा, अशी मागणी नगराध्यक्ष सकपाळ यांनी लेखी पत्राद्वारे केली. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही कदम यांनी दिली.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी १६ इलेक्ट्रिक कचरा वाहने खरेदीसाठी निधी मिळावीत, अशी मागणी केली तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत विविध विकासकामांसाठी निधी देण्याबाबतही त्यांनी निवेदन दिले. चिपळूण नगरपालिकेचा वाढता विस्तार आणि वाढत्या कचऱ्याच्या प्रमाणामुळे सध्या उपलब्ध सुविधा अपुऱ्या पडत असल्याचे नगराध्यक्षांनी निदर्शनास आणून दिले. शिवाजीनगर येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रावर सुक्या कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे; मात्र त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याची बाब त्यांनी मांडली. या पार्श्वभूमीवर ५ टन प्रतिदिन क्षमतेचा गॅसिफिकेशन प्लांट उभारण्यासाठी सुमारे ४ कोटी ९९ लाख ५५ हजार ३५७ रुपये निधी मंजूर करून द्यावा, अशी विनंती नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केली.
---
चौकट
चार कोटी ९९ लाखांचे अंदाजपत्रक
दररोज पाच टन क्षमतेचा गॅसिफिकेशन प्लांट उभारण्याचा प्रस्ताव पालिकेकडून तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी १२ जून २०२५ला दरपत्रक मागवण्याची सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या तीन दरपत्रकांपैकी सर्वांत कमी दरानुसार ४ कोटी ९९ लाख ५५ हजार ३५७ रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या कामाच्या तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव ठाणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

अमृता खानविलकरच्या 'अमूल्य'मध्ये कोणत्या साड्या आहेत? सगळ्यात स्वस्त साडी किती हजाराची?

Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

SCROLL FOR NEXT