कोकण

क्षत्रिय मराठा घाडीगावकर समाजाचा उद्या मेळावा

CD

क्षत्रिय मराठा घाडीगावकर
समाजाचा उद्या मेळावा
आचरा :जागतिक महिला दिनानिमित्त क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज, मुंबई तर्फे १५ ला सायंकाळी ४ वाजता वार्षिक स्नेहसंमेलन व महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम पुष्पा पार्क महानगरपालिका शाळा, मालाड (पूर्व) येथे होईल. यास मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर संजय घाडी, शिवसेना उपनेत्या संजना संजय घाडी, समाजाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष घनश्याम गावकर, सरचिटणीस गजानन घाडीगावकर, मुंबईचे माजी अध्यक्ष अनंत घाडी, मध्यवर्ती विभागाच्या सहचिटणीस रश्मी घाडीगावकर, आणि मध्य मुंबई विभाग खजिनदार दर्शना घाडी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यास घाडीगावकर समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
.....
कणकवली येथे उद्या
शास्त्रीय संगीत कार्यशाळा
आचरा : आदर्श संगीत विद्यालय, कणकवली यांच्या वतीने १५ ला सकाळी साडेनऊ वाजता शास्त्रीय संगीत ‘धृपद–धमार’ गायनाची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील प्राचीन आणि गंभीर मानली जाणारी धृपद–धमार गायन शैली, याविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती देणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे. कार्यशाळेत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह नोम तोम आलाप, रागमांडणी, तालरचना आणि लयकारी यांचे मार्गदर्शन केले जाईल. तनुजा पांडे (पुणे), ओवी पांडे, प्रणय सकपाळ आदी यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यालयाच्या संचालिका तेजस्विता संदीप पेंडुरकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT