कोकण

मोफत श्वसनरोग तपासणी शिबिर

CD

अपरांत हॉस्पिटलतर्फे सोमवारी
मोफत श्वसनरोग तपासणी शिबिर
चिपळूण ः येथील अपरांत हॉस्पिटलतर्फे मोफत श्वसनरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर १६ मार्चला सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत अपरांत हॉस्पिटल येथे होणार आहे. शिबिरात मुंबईतील नामांकित लीलावती हॉस्पिटल आणि सर जे. जे. हॉस्पिटलशी संलग्न असलेले अनुभवी श्वसनरोग तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत.
शिबिरामध्ये श्वसनविकारांची अचूक तपासणी करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये स्पायरोमेट्री (फुप्फुसांची क्षमता तपासणी), ऑक्सिजन पातळी तपासणी, ईसीजी तसेच डायबेटिस तपासणी या सुविधा रुग्णांना मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असलेल्या, एक्स-रे, सीटीस्कॅन, रक्त व लघवी तपासणी या तपासण्यांवर विशेष सूट म्हणून २० टक्के सवलत देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अपरांत हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

LPG Crisis: दररोज ७५ लाख बुकिंग; तरीही गॅस तुटवडा नाही, साठेबाजी आणि काळाबाजारावर लगाम; केंद्राने दिले कडक निर्देश

Dry Fruits Price Hike: बदाम, पिस्ता, खजुर महागले! युद्धजन्य परिस्थितीमुळे सुक्या मेव्याची आवक ठप्प, दरवाढ किती?

Horoscope : उद्या १४ मार्च 'या' ४ राशींसाठी ठरणार गेमचेंजर; शेअर्सची गुंतवणूक देईल लाखोंचा फायदा, करियर अन् वैवाहिक जीवनाला कलाटणी

Palghar Crime : पालघर हादरले! मजुराला झाडाला उलटे टांगून जखमांवर चोळले तिखट, विटभट्टी मालकावर गुन्हा दाखल

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

SCROLL FOR NEXT