कीटकनाशक प्यायलेला
तरुण रुग्णालयात
रत्नागिरी ः तालुक्यातील शिवारआंबेरे परिसरातील एका तरुणाने घरातून दुचाकी खरेदीसाठी पैसे देत नाहीत, या रागाने कीटकनाशक पिले. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी (ता.१३) सकाळी निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाला दुचाकी खरेदी करावयाची होती. यासाठी घरातून पैसे मिळत नसल्याच्या मानसिकतेने त्याने आंबा फवारणीचे कीटकनाशक द्रव्य तो प्यायला. तत्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिसचौकीत नोंद करण्यात आली आहे.
मधमाशांच्या हल्ल्यात
प्रौढ जखमी
रत्नागिरी ः तालुक्यातील पूर्णगड येथील सोसायटीत कामाला असलेल्या प्रौढावर मधमाशांनी हल्ला केला. त्यात तो जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. प्रदीप रविकांत कामतेकर (वय ४०, रा. पूर्णगड, जि. रत्नागिरी) असे मधमाश्यांनी हल्ला केलेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १३) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप कामतेकर हे पूर्णगड येथील सोसायटीत दुचाकीवरून कामाला जात असताना रस्त्यात मधमाशांच्या घोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये प्रदीप कामतेकर हे जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिसचौकीत नोंद करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.