कोकण

निधी आणण्याची हिंमत दाखवा

CD

30725

निधी आणण्याची हिंमत दाखवा

समीर नलावडे ः कणकवलीत सत्ताधाऱ्यांना आव्हान

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.१३ ः कणकवली नगरपंचायतीची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पालकमंत्र्यांच्या माध्यमातून कणकवली नगरपंचायतीला १२ कोटी ६० लाखांचा निधी आला होता. या निधीतून आता विकासकामे सुरू होत असून त्‍याचे श्रेय नगरपंचायतीचे विद्यमान सत्ताधारी घेत आहेत. त्‍यांनी फुकाचे श्रेय घेण्यापेक्षा कणकवलीसाठी २०० कोटींचा निधी आणून दाखवावा, असे आव्हान माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि भाजपचे नगरसेवक बंडू हर्णे यांनी आज दिले.
येथील संपर्क कार्यालयात श्री.नलावडे आणि श्री.हर्णे यांनी पत्रकार परिषद घेतली. नलावडे म्‍हणाले, ‘‘शहराच्या विविध विकासकामांसाठी आम्‍ही शासनाकडे प्रस्ताव पाठवले होते. त्‍यानुसार पालकमंत्र्यांच्या माध्यमातनू १२ कोटी ६० लाखांचा निधी आला. मात्र, त्‍यानंतर नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. त्‍यामुळे ही कामे मार्गी लागली नाहीत. आता नवीन कार्यकारीणी आम्‍ही आणलेल्‍या निधीतून विकासकामांचे नारळ फोडत आहेत. विकासकामांचा प्रारंभ करताना आपणच निधी आणल्‍याचा दावा करत आहेत.’’
श्री.हर्णे म्‍हणाले, ‘‘कणकवली क्रीडा संकुलासाठी ४ कोटींचा निधी आला आहे. तसेच शहरातील विविध रस्ते, गटारे, सुशोभिकरण आदी कामांसाठी साडेआठ कोटींच्या निधीतून सध्या कामे केली जात आहेत. प्रत्‍येक शुभारंभावेळी हा निधी आम्‍हीच आणला असाही दावा सत्ताधारी मंडळी करत असून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत.’’
नलावडे म्‍हणाले, ‘‘नगरपंचायत निवडणुकीत विद्यमान सत्ताधाऱ्यांनी २०० कोटींचा निधी आणून पाच शाश्‍वत कामे करणार असल्‍याची वल्‍गना केली होती. आता नगरविकास खाते त्‍यांच्याच मंत्र्यांकडे आहे. त्‍यामुळे त्‍यांनी कणकवलीसाठी २०० कोटींचा निधी आणून दाखवावा. शहरासाठी एवढा निधी मिळत असेल तर त्‍याचे स्वागतच करू. शहराच्या विकासाला आमचा कोणताही विरोध नाही. मात्र, चुकीच्या पद्धतीने कारभार होत असेल तर त्याला कडाडून विरोध केला जाईल.
--
विकास आराखड्यात नागरिकांसाेबत
शहराचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध झाला आहे. या आराखड्यात सुमारे ५१० हेक्टर जमिनीवर विविध आरक्षणे टाकली असून त्याला नागरिकांकडून विरोध होत आहे. चुकीच्या पद्धतीने टाकलेल्या आरक्षणांच्या विरोधात जमीनमालक व नागरिक उपोषणाच्या तयारीत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा असेल, असेही नलावडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT