कोकण

तेलंगी ब्राह्मणाने वसवलेले सूर्यमंदिर

CD

-rat१४p३.jpg-
P२६O३०७७३
श्री देव आदित्यनारायण मंदिर, आरवली
-rat१४p४.jpg-ः
२६O३०७७४
श्री देव आदित्यनारायण, आरवली
-rat१४p५.jpg-ः
२६O३०७७५
मिलनाथ पातेरे
-----------
तळपत्या सूर्याचे दैवीत्व............. लोगो
(१ मार्च पान ६)
तेलंगी ब्राह्मणाने वसवलेले सूर्यमंदिर

शास्त्री आणि सोनवी नद्यांच्या संगमावर वसलेल्या संगमेश्वराचा राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, मराठा आणि पेशवाई अशा विविध राजवटींनी प्रभावित आहे. मागील सदरात आपण संगमेश्वरमधील आंबवपोंक्षे गावातील श्री सूर्यनारायण मंदिराचा इतिहास पाहिला. या सदरात त्याच आंबवपोंक्षेशी संबंध असलेल्या आरवली गावातील श्री आदित्यनारायण मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत.

--मिलनाथ पातेरे
--------
आरवली हे गाव संगमेश्वर तालुक्यापासून साधारण २०-२५ किलोमीटर अंतरावर आहे. गावातील ब्राह्मणवाडी परिसरात हे श्री आदित्यनारायण मंदिर वसलेले आहे. इ.स. १८२१ मध्ये आंबवपोंक्षे येथील पोंक्षे मंडळी गावात सध्याच्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यावर नवीन ठिकाणी नवीन मंदिर आणि नवीन मूर्ती स्थापन केली गेली. आणि जुन्या मंदिरातील जुनी मूर्ती ज्या ठिकाणी पोंक्षे परिवार पहिल्यांदा वसले होते त्या मूळ स्थानी ठेवली गेली. पुढे इ.स. १८३० मध्ये दक्षिण भारतामधून एक तेलंगी ब्राह्मण या भागातून भ्रमण करत असता त्यांनी ती मूर्ती पहिली आणि मूर्तीचे महत्त्व समजून तिची स्थापना बाजूच्या आरवली गावात केली व तेथे मंदिर स्थापित केले. अशा प्रकारे या मूर्तीचे मूळ स्थान आंबव असले तरी तिचे नवे स्थान आरवलीत झाले. मंदिर वस्तीच्यामध्ये स्थापन केलेले असून, त्याची रचना मंडप आणि गर्भगृह अशी आहे. गर्भगृह पूर्वाभिमुख असून सांधार (परिक्रमानाची सोय असलेले) आहे.
* मूर्तिकला
श्री आदित्यनारायणाच्या मूर्तीची उंची २८ इंच व रूंदी २२ इंच आहे. इ.स. १८३०च्या सुमारास घडवलेली ही मूर्ती उत्तर मराठाकालीन शिल्पशैलीचे उत्तम उदाहरण आहे. मूर्ती समपद स्थानकमुद्रेत उभी असून, किरीटमुकुट परिधान केलेली आहे. दोन हातांत शंख आणि चक्र धारण केले आहे. हे वैशिष्ट्य सूर्यदेव आणि विष्णूदेव यांचे संमिश्र स्वरूपाचे सूर्यनारायण द्योतक आहे. प्रभावळ अर्धवर्तुळाकार असून, सूर्यनारायणाच्या मूर्तीच्या पायाजवळ दोन पुरुष सहाय्यक देवता आहेत. त्यांनी स्थानिक वेशभूषेशी साम्य दर्शवणारी धोतर परिधान केलेली आहेत. उल्लेखनीय म्हणजे ही मूर्ती अश्वारूढ किंवा त्याचा सारथी अरुण याचे चित्रण असणारी सूर्यनारायण नसून केवळ समपद द्विभुजीय देवतेप्रमाणे आहे. गर्भगृहाच्या मागील भिंतीवर उजव्या बाजूला हनुमान तर डाव्या बाजूला गणपती स्थानापन्न आहेत.
* धार्मिक परंपरा व उत्सव
आरवलीच्या श्री आदित्यनारायण मंदिराची एक विशेष परंपरा म्हणजे येथे निश्चित पुजारी नसून गावातील प्रत्येक घर पंधरा-पंधरा दिवस पूजेची जबाबदारी घेते. दररोज संध्याकाळी आरती केली जाते. जे कोकणातील सामूहिक भक्तीचे सुंदर उदाहरण आहे. रथसप्तमी, रामनवमी, दीपावली, होळी, गोपाळकाला असे सण मोठ्या उत्सवाने साजरे केले जातात. या सणांव्यतिरिक्त वर्धापनदिन दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस प्रतिवर्षी वैशाख शुद्ध पंचमी, षष्ठी आणि सप्तमी या तीनदिवसीय तिथींना केला जातो. या निमित्ताने इथेही आंबवपोंक्षे गावाप्रमाणे भजने, कीर्तने संगीत आयोजित केली जातात आणि यासाठी अनेक मोठमोठे कलाकार आपली कला सादर करतात.
यावर्षीचा वर्धापनदिन विशेष आहे कारण, हा मंदिराचा १५०वा वर्धापनदिन उत्सव आहे. हा उत्सव १९ ते २३ एप्रिल असा पाच दिवस साजरा केला जाणार आहे. या उत्सवामध्ये धार्मिक कार्यक्रमांमध्ये षोडशोपचार पद्धतीने पूजाविधी, सौरयाग, लघुसौरयाग आणि शोभायात्रा यांचा समावेश आहे. सोबतच लहान मुलांच्या स्पर्धा, विविध गुणदर्शन कार्यक्रम आणि हळदीकुंकू असे कार्यक्रमही आयोजित केले आहेत. श्री लक्ष्मीप्रसाद पटवारी कुलकर्णी यांचे कीर्तन हरिभक्त पारायण, प्रसिद्ध अभिनेते विघ्नेश जोशी यांचा संगीत कार्यक्रम आणि श्री गुरुप्रसाद दत्तात्रय कानिटकर यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य ते साम्राज्य’ या विषयावरील प्रवचन हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

(लेखक हे पुरातत्त्ववेत्ता आणि इतिहासकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

PMPML Bus: ‘पीएमपी’त महिला असुरक्षित; ‘परिसर’चा अहवाल; ५७ टक्के प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

मीन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): शुक्राचा अनुकूल प्रभाव, गुढीपाडव्यापासून व्यवसायात प्रगतीचे संकेत

HIV injection attack : लग्न मोडलं… सूडाने पेटलेल्या तरुणाने तरुणीला दिलं एचआयव्ही बाधित रक्ताचं इंजेक्शन; संपूर्ण प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT