कोकण

पवन तलाव मैदान विकासासाठी १ कोटी १४ लाख

CD

-rat१४p१२.jpg-
२६O३०७९३
चिपळूण ः पवन तलाव मैदानातील सोयीसुविधांसाठी निधी मंजूर झाल्याने मैदानाचे रूपडे पालटणार आहे.
-----
पवन तलाव मैदानाचे रूपडे पालटणार
विकासासाठी १ कोटी १४ लाखांचा निधी मंजूर; खेळाडूंसह क्रीडाप्रेमींना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः शहरातील खेळाडूसाठी आधार ठरलेले पवन तलाव मैदान आता कात टाकणार आहे. या मैदानाच्या विकासासाठी १ कोटी १४ लाख निधी मंजूर झाला आहे. आमदार शेखर निकम यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या या निधीतून मैदानातील विविध कामे पूर्णत्वास जाण्यास मदत होणार आहे.
शहराच्या मध्यभागी असलेले पवन तलाव मैदान शहरवासियांचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. शहरातील खेळाडू येथे सातत्याने सराव करत असतात. क्रिकेट, कबड्डी, फुटबॉलसह चालण्यासाठी या मैदानात नागरिकांची रेलचेल असते. चार वर्षापूर्वी पवन तलाव मैदानाच्या विकासासाठी कोटीचा निधी आमदार शेखर निकम यांनी पाठपुरावा करून आणला होता. या निधीतून मैदानाचे सपाटीकरण, गवत, संरक्षण भिंती, प्रवेशद्वार आदी कामे मार्गी लागली; मात्र मैदानातील कॉमेंट्री बॉक्सची इमारत विकसित झालेली नाही. मैदानातील बाल्कनीचे बांधकाम झाले; परंतु तेथील विविध कामे अद्याप मार्गी लागलेली नाहीत. सध्या मंजूर झालेल्या १ कोटी १४ लाख रुपयाच्या निधीतून रखडलेली कामे पूर्णत्वास जाण्यास मदत होणार आहे.
पवन तलाव मैदान सुसज्ज होणार असल्याने चिपळूणमधील क्रीडापटूंना सराव व स्पर्धांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यातून स्थानिक क्रीडासंस्कृतीला मोठी चालना मिळणार आहे. आमदार निकम यांच्या या प्रयत्नांमुळे चिपळूणच्या क्रीडाक्षेत्राला नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल, अशी भावना क्रीडाप्रेमी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
-------
सुविधेमुळे तरुणांची मैदानाकडे धाव
गेल्या तीन-चार वर्षात प्रामुख्याने शहरातील क्रीडांगणाच्या विकासाला चालना मिळण्यास मदत झाली. यापूर्वी शहरात खेळाडूंसाठी पवन तलाव मैदानाचा आधार होता; मात्र आता गोवळकोट तसेच बहादूरशेखनाका येथे नव्याने मैदाने विकसित झाली आहेत. बहादूरशेखनाका येथील वीर सावरकर मैदान लघुउद्योगासाठी आरक्षित असले तरी अद्याप त्याचा विस्तार झालेला नाही; मात्र मैदान विकसित झाल्याने येथे भव्य महोत्सव होऊ लागले आहेत. विविध खेळासाठीदेखील तरुण मंडळे त्याचा वापर करत आहेत.

LPG Crisis: इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्रात परिणाम! महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय; आता LPG पुरवठ्यावर नजर राहणार

लखनौचा कायापालट! ४५ मिनिटांचा प्रवास आता फक्त १५ मिनिटांत; पाहा योगींचा 'ग्रीन' प्लॅन!

PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा आले २ हजार रुपये! PM मोदींनी जारी केला २२ वा हप्ता; यूपीच्या शेतकऱ्यांवर पैशांचा पाऊस!

March Ending: 31 मार्चपूर्वी करा हे काम! नाहीतर PF आणि पेन्शन खाते होऊ शकते निष्क्रिय; करसवलतीचा लाभही मिळणार नाही

Ayodhya Ram Mandir : काय आहे राम मंदिरात बसवले जाणारे 'श्री राम यंत्र'? राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार भव्य सोहळा!

SCROLL FOR NEXT