-rat१४p२.jpg-
P२६O३०७७२
गोवा : राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेत क्षेत्रभेट देणारे रत्नागिरीच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातील विद्यार्थी.
-----
देव, घैसास, कीर महाविद्यालयाची
राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेत क्षेत्रभेट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेला क्षेत्रभेट दिली.
क्षेत्रभेटीचे समन्वयक आनंद लोकापुरे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेची सुरू असलेली कार्ये व संशोधन प्रकल्प, समुद्रातील तेलगळती, विविध प्रकारच्या प्रदूषणांवर मात करण्यासाठी संस्थेकडून सुरू असलेले संशोधन कार्य, संस्थेच्या संशोधन कार्यात उपयोगी येणारी संशोधन जहाजे, संशोधन जहाजांवर वापरली जाणारी उपकरणे व त्यांची कार्ये याबद्दल माहिती देण्यात आली. संस्थेमध्ये संशोधन कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
सेमिनार हॉलमध्ये झालेल्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांना द्वारका येथे समुद्रामध्ये झालेले संशोधन व त्या ठिकाणाहून मिळालेले द्वारका नगरीचे जतन करून ठेवलेले अवशेष पाहता आले. त्याबद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर सागरी पुरातत्त्वशास्त्र अंतर्गत झालेल्या संशोधनामध्ये मिळालेल्या इतर वस्तूंचे प्रदर्शन तसेच महासागरशास्त्रीय संशोधनासाठी उपयुक्त असणारी काही उपकरणे पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. क्षेत्रभेटीवेळी महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. सानिका कीर व प्रा. प्रथमेश आंग्रे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.