कोकण

सती विद्यालयातील विद्यार्थ्यांची जिद्दीला साथ

CD

-ratchl१४१.jpg
26O30795
चिपळूण ः जिद्द शाळेस अपंग मित्र निधी सुपूर्द करताना मुख्याध्यापक अरविंद सकपाळ व सहकारी.
-------------
काही सुखद---लोगो
विद्यार्थ्यांच्या संवेदनशीलतेतून ‘अपंग मित्र निधी’
सती विद्यालयाचा पुढाकार ; ३७ हजाराचा निधी शाळेला सुपूर्द
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः विद्यार्थ्यांमध्ये सामाजिकतेची भावना रूजावी, त्यांच्यात सामाजिक कार्याची ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी सती चिंचघरी येथील सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या प्राथमिक विद्यालयातर्फे अपंग मित्र निधीची उभारणी केली जात आहे. यावर्षी विद्यार्थ्यांनी ३७ हजार ४११ रुपयाचा निधी संकलित केला. हा निधी चिपळुणातील ‘जिद्द मतिमंद शाळे’च्या कार्यास सुपूर्द करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये सहानुभूती व सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने शाळेने हा उपक्रम हाती घेतला. जिद्द शाळेचे मुख्याध्यापक शिंदे यांनी अपंग मित्र निधी संकलनाची संकल्पना मांडत २०० कार्ड शाळेकडे दिली होती. या कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत निधी जमा केला. मुख्याध्यापक अरविंद सकपाळ, शिक्षिका मनिषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिंदे, विनया नटे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, ज्योती चाळके, रूपाली खरात, वर्षा सकपाळ, शीतल पाटील, स्वरा भुरण तसेच शिक्षकेतर कर्मचारी विनोद उदेग, एकनाथ चाळके व प्रतिभा तांबिटकर यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
--
चौकट
पालकांचाही सहभाग
एका कार्डवर २०० रुपयांपेक्षा अधिक निधी जमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिद्द शाळेकडून विशेष प्रमाणपत्र देण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांसोबत पालकांचेही मोठे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT