पेढांबेत आज ‘लायन्स’ची परिषद
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः लायन्स क्लबची विभागीय परिषद तालुक्यातील पेढांबे येथील वॉटरपार्क अँड रिसॉर्ट येथे रविवारी (ता.१५) सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या परिषदेसाठी मल्टिपल ३२३४चे इंटरनॅशनल डायरेक्टर राजभाई मुछाल उपस्थित राहणार आहेत.
या विभागीय परिषदेसाठी दापोली ते मालवणदरम्यानचे २० लायन्स क्लबचे सदस्य व चार लिओ क्लबचे सदस्य सहभागी होत आहेत. या क्लबमध्ये कोकण विभाग सदस्यसंख्येत प्रांतामध्ये अग्रस्थानी आहे. रिजनमधील सेवाकार्यांचा आढावा, आगळ्यावेगळ्या सर्विस अॅक्टिव्हिटीचे आदानप्रदान, उत्तम कामगिरी करणाऱ्या सदस्यांच्या कार्याचा गुणगौरव सोहळा, क्विझ कॉन्टेस्ट, बॅनर प्रेझेंटेशन, बेस्ट सिग्नेचर स्पर्धेसह विविध मनोरंजन कार्यक्रम येथे होणार आहेत. समाजातील गरजवंतांची गरज ओळखून सेवाकार्यात कसा बदल करता येईल तसेच प्रभावी नेतृत्व कसे असावे यावर मुच्छाल सर्व लायन सदस्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कोकण विभागातील जास्तीत जास्त लायन्स, लिओ सदस्यांनी या परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन अमर शेट्ये व लायन्स क्लब चिपळूण अध्यक्ष शिरीष मुळे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.