-Rat१४p६.jpg-
२६O३०७८७
रत्नागिरी : आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार स्वीकारताना शलाका पवार.
------------
शलाका पवार यांचा पुरस्काराने गौरव
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १४ ः जिल्हा परिषद रत्नागिरी व महिला व बालविकास विभागाच्यावतीने २०२५-२६ या वर्षासाठी देण्यात येणाऱ्या आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने वेसवी नांदगाव येथील अंगणवाडी सेविका शलाका पवार यांना सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्या अंगणवाडीला सुपर अंगणवाडी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
पवार या वेसवी नांदगाव येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असून, त्यांनी बालशिक्षण व बालविकासासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. स्तनदा माता, गर्भवती माता तसेच किशोरी मुलींसाठी आहार, आरोग्य, स्वच्छता व पोषण आहार याबाबत जनजागृती केली. तसेच पूर्वशालेय शिक्षणातील आकार कुशल अंगणवाडी कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना सुवर्ण प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यात त्यांना माता-पालक, महिला मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.