30803
शिवसेना पावशी विभागातर्फे
विविध सामाजिक उपक्रम
आमदार राणेंच्या वाढदिवसाचे निमित्त
कुडाळ, ता.१४ ः आमदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिंदे शिवसेना पावशी विभागातर्फे महारक्तदान शिबिर तसेच पावशी विभागातील सर्व गावांतील मंदिरामध्ये अभिषेक आणि विशेष पूजेचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषद सदस्य दादा साईल यांनी ही माहिती दिली.
साईल म्हणाले, ‘‘आमदार राणे यांच्या १७ मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यासाठी शिवसेना पावशी विभागाची विशेष बैठक आज पणदूर येथील शिवसेना शाखा कार्यालयात झाली. या बैठकीत सर्व मंदिरांमध्ये अभिषेक व पूजनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले. तसेच गरजूंना जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्य वाटप करण्याचे नियोजन केले. विभागातील युवा सेनेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सर्व प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप होणार आहे. पणदूर येथे २०, २१, २२ मार्च रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचेही आयोजन करण्याचे ठरविले. या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे.’’
विभाग प्रमुख नागेश परब म्हणाले, येणाऱ्या काळात संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक गावात भेट देऊन शाखाप्रमुख नियुक्ती व शाखा बांधणी पूर्ण करण्याचे तसेच मंजूर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन करू.’’ उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, विभाग प्रमुख नागेश परब, उपतालुका प्रमुख अरुण सावंत, पंचायत समिती सदस्य निखिल कांदळगावकर, महिला तालुकाप्रमुख वैशाली पावसकर, महिला विभाग प्रमुख मृणाल परब, उपविभाग प्रमुख गजानन कुलकर्णी, सदा अणावकर, कुबल गुरुजी, शेखर गोसावी उपस्थित होते. पणदूर शाखाप्रमुख बबन निर्गुण यांनी स्वागत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.