30820
नांदगावात दुग्ध उत्पादक
सहकारी संस्थेचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १४ ः येथे दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित नांदगाव या संस्थेच्या स्थापनेच्या माध्यमातून नांदगावमध्ये दुग्ध व्यवसाय सुरू होत आहे. नांदगाव ओटव फाटा येथील या दुध डेअरीचे उद्घाटन सरपंच रविराज मोरजकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपसरपंच इरफान साटविलकर, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, तोंडवली-बावशी सरपंच मनाली गुरव, बेळणे सरपंच अविनाश गिरकर, सावडाव सरपंच आर्या वारंग, ओटव माजी सरपंच तथा जिल्हा परिषद सदस्या रुहिता तांबे, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, गोकुळ दूध संघाचे सिंधुदुर्ग विस्तार अधिकारी राजेश गावकर, सुपरवायझर पुंडलिक येंडे, रोहित शिंदे, नांदगाव दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष विठोबा कांदळकर, नांदगाव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. झेमणे, ग्रामपंचायत सदस्य सदस्य विनोद मोरये, संतोष बिडये, अक्षता खोत, जैबा नावलेकर, रमिजान बटवाले तसेच ओटव माजी सरपंच हेमंत परुळेकर, नांदगाव माजी सरपंच सौ. बापर्डेकर आदी मान्यवर, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दुग्ध उत्पादक संस्थेचे संचालक राजू तांबे, सूत्रसंचालन ऋषिकेश मोरजकर यांनी केले. संस्थेचे सचिव राजू खोत यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.