कोकण

जिल्हा परिषदेच्या शाळा १६ मार्चपासून सकाळच्या सत्रात

CD

जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात
​उद्यापासून अंमलबजावणी ; उन्हाचा कडाका वाढल्याने निर्णय
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. १४ : राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून, दुपारच्यावेळी तापमानात मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. १६ मार्चपासून जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार ते शुक्रवार शाळा सकाळी ७ ते ११:३० पर्यंत आणि शनिवारी सकाळी ७.३० ते १०.३० या नेहमीच्या वेळेनुसार सुरू राहतील.
मार्च महिना सुरू होताच रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. दुपारच्या सत्रात शाळा सुटताना विद्यार्थ्यांना प्रखर उन्हाचा सामना करावा लागत होता, ज्यामुळे उष्माघाताचा धोका संभवतो. पालकांकडूनही शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी होत होती. याची दखल घेत प्रशासनाने शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दुपारच्या तीव्र उन्हापूर्वी घरी पोहोचता येईल.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्ह्यात एकूण २,४०० प्राथमिक शाळा कार्यरत आहेत. या सर्व शाळांना हा आदेश लागू करण्यात आला आहे. शाळांच्या वेळेत बदल झाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्याची तीव्रता संपेपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत हे बदल लागू राहतील, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Watermelon Deaths : कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू? पायधुनीतील घटनेनंतर कलिंगड विक्रीत 50 टक्क्यांनी घट; भीतीपोटी ग्राहकांनी फिरवली पाठ

IPL म्हणजे बिझनेस, मनोरंजन... क्रिकेट नाहीच! काव्या मारनच्या संघातील सदस्याचा मोठा दावा; म्हणाला, इथे खेळाच्या विकासापेक्षा...

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर तहसील येथे चर्मकार समाजाचे निदर्शने करत आंदोलन

Maharashtra Result Day : राज्य मंडळाचा नवा निर्णय; पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना निकालासोबत उत्तरपत्रिकाही मिळणार

Grandson Property Rights India : ... तर आजोबाच्या संपत्तीत नातवाला मिळणार नाही हिस्सा, नवा नियम काय सांगतो ?

SCROLL FOR NEXT