rat15p7.jpg-
30943
साखरपा : बलिदान मासानिमित्य जमलेले ग्रामस्थ.
कोंडगावमध्ये धर्मवीर बलिदान मास श्रद्धापूर्वक स्मरण
महिनाभर कडक नियमांचे पालन; गावातून काढली मुक पदयात्रा
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १५ ः छत्रपती संभाजी महाराज यांच्या अतुलनीय बलिदानाचे स्मरण म्हणून कोंडगाव (ता. संगमेश्वर) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘बलिदान मास’ अत्यंत श्रद्धेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पाळण्यात आला. फाल्गुननिमित्त आयोजित या उपक्रमात कोंडगावसह पंचक्रोशीतील शेकडो शंभूभक्त स्वयंप्रेरणेने सहभागी झाले होते.
बलिदान मासाच्या कालावधीत दररोज रात्री ८ वाजता ग्रामस्थ स्थानिक श्रीदेव गिरजाई मंदिरात एकत्र जमत असत. यावेळी ‘संभाजी हृदय’ या ग्रंथातील श्लोक, ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्रांचे सामूहिक पठण करून महाराजांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या मंत्रोच्चारामुळे संपूर्ण परिसरात शिवकालीन स्मृतींना उजाळा मिळून वातावरण भारावून गेले होते. या विशेष महिन्यामध्ये अनेक शंभूभक्तांनी आपल्या लाडक्या राजाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वैयक्तिक स्तरावर विविध नियमांचे पालन केले. यामध्ये महिनाभर पायात चप्पल न घालता वावरणे, महिनाभर आपल्या आवडत्या अन्नपदार्थांचा त्याग करणे, दिवसातून केवळ एकदाच भोजन करणेअशा कडक नियमांचे पालन करून तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेकांनी आपली श्रद्धा व्यक्त केली.
बलिदान मासाच्या अखेरच्या दिवशी सर्व शंभूभक्तांनी गावातून ‘मुक पदयात्रा’ काढली. अत्यंत शांततेत आणि शिस्तीत निघालेल्या या पदयात्रेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या उपक्रमामुळे कोंडगाव परिसरातील युवा पिढीमध्ये राष्ट्रप्रेम आणि इतिहासाप्रति जाणीव अधिक प्रगल्भ झाल्याचे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.