कोकण

मालवणात अतिक्रमणावरून तणाव

CD

30985

मालवणात अतिक्रमणावरून तणाव

ठाकरे सेना नगरसेवक आक्रमक; स्टॉलचे काम रोखले, कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १५ : शहरातील भरड येथील मुख्य रस्त्यावर नगरपालिकेच्या वाहनतळासमोर झालेली अतिक्रमणे हटविण्याबाबत वारंवार मागणी करूनही ढिम्म प्रशासन हलत नसल्याने ठाकरे शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. नगरसेवक महेंद्र म्हाडगूत आणि मंदार ओरसकर यांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यालगत सुरू असलेले एका दुकानाचे अतिक्रमण थांबविले. यावेळी संबंधित व्यावसायिक आणि नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मालवण-कसाल मार्गावरील भरड ते देऊळवाडा या मुख्य रस्त्यावर विक्रेते आणि स्टॉलधारकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली आहेत. यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नगरसेवक ओरसकर यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले होते; मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर नगरसेवकांनी स्वतः रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. पालिकेच्या वाहनतळासमोर एका भाजी विक्रेत्याच्या दुकानाची शेड उभारण्याचे काम सुरू असताना महेंद्र म्हाडगूत, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, उमेश चव्हाण आणि दत्ता पोईपकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन हे काम रोखले.
नगरसेवकांनी स्वतः कारवाई सुरू केल्याचे समजताच पालिका प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित व्यावसायिकाला अनधिकृत बांधकाम न करण्याचे तोंडी आदेश दिले; मात्र, केवळ तोंडी आदेशावर न थांबता ठोस कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी लावून धरली.
शहरातील नवीन इमारतींनी रस्ता रुंदीकरणासाठी सोडलेली जागा अद्याप पालिकेने ताब्यात घेतलेली नाही. या जागा ताब्यात घेतल्याशिवाय रस्ता रुंदीकरण शक्य नाही, असे म्हाडगूत यांनी स्पष्ट केले. देऊळवाडा पुलाजवळील अतिक्रमणांवरही तातडीने कारवाई न झाल्यास ठाकरे शिवसेना अधिक तीव्र पावले उचलणार असून, प्रसंगी उपोषणाला बसण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
----
प्रशासन, विरोधकांना खडेबोल
यावेळी आक्रमक झालेल्या महेंद्र म्हाडगूत यांनी प्रशासनाला आणि विरोधकांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले, ‘‘भरड नाका ते देऊळवाडा हा शहरातील मुख्य रस्ता आहे. अतिक्रमणांमुळे येथे अपघाताची भीती वाढली आहे. आम्ही पैसे खाण्यासाठी नव्हे, तर मालवण शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी झटत आहोत. नागरिकांना मोकळा श्वास घेता यावा, यासाठी आम्हाला कोणी मारायला आले, तर आम्ही मार खायलाही तयार आहोत; पण अतिक्रमणे सहन करणार नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: जगात पुन्हा युद्धाची चाहूल? अमेरिकेवर विश्वास नाही; युद्ध भडकू शकतं, इराणचा कडक इशारा, चिंता वाढली!

Multibagger Stock: लखपतींचे करोडपती बनवणारा स्टॉक! फक्त ₹1 लाखाचे झाले तब्बल ₹1.30 कोटी

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

Junnar 12th Result: जुन्नर तालुक्यात बारावीचा निकाल ९१.४९ टक्क्यांवर; मुलींची बाजी, सात कनिष्ठ महाविद्यालये शंभर टक्के

SCROLL FOR NEXT