31061
वनभोजन उपक्रमासाठी शाळेला मदत
तळेरे ः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे क्र. १ च्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या ‘वनभोजन’ या विशेष उपक्रमासाठी वारगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुधाकर नर यांनी मोलाची आर्थिक देणगी देऊन सामाजिक बांधीलकी जपली. या शाळेला भेट देऊन ही मदत श्री. नर यांनी मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी त्यांच्यासोबत साळिस्ते शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर ताम्हणकर उपस्थित होते. शिडवणे शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ज्ञ मनोहर कोकाटे यांच्या हस्ते श्री. नर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. देणगीदार नर यांनी शिडवणे शाळेच्या उपक्रमांबद्दल कौतुक व्यक्त करत भविष्यातही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या मदतीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.