कोकण

७२ विद्यार्थ्यांनी गिरवले आधुनिक इंजिन तंत्रज्ञानाचे धडे

CD

आधुनिक इंजिन तंत्रज्ञानाचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
आंबव येथील माने अभियांत्रिकीत आयोजन ; ७२ जणांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. १६ : आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात ऑटोमोबाईल विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी ‘बीएस सिक्स’ (BS-VI) या प्रगत उत्सर्जन मानकावर आधारित विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ७२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आधुनिक इंजिन तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान प्राप्त केले.
शिबिराचे उद्‍घाटन संस्थेचे संस्थापक व माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. महेश भागवत, उपप्राचार्य व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ. अनिरुद्ध जोशी, सिंधुदुर्ग मेकॅनिक असोसिएशन (कणकवली शाखा) अध्यक्ष नितीन तावडे, संदीप पारकर, प्रशांत राणे आणि दशरथ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी माने म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी अशा प्रकारची तांत्रिक प्रशिक्षणे अत्यंत फायदेशीर ठरतात. प्रत्यक्ष सरावामुळे विद्यार्थ्यांमध्ये योग्य दृष्टिकोन तयार होतो जो त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करतो.’
या शिबिरात BS-VI उत्सर्जन मानदंड आणि पर्यावरणीय नियम, प्रगत इंजिन तंत्रज्ञान व त्यातील तांत्रिक बदल, उद्योगाच्या सध्याच्या गरजा आणि व्यावहारिक कौशल्ये यावर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. अनिरुद्ध जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रवण करकरे यांनी या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. भविष्यातील करिअरसाठी हे प्रशिक्षण मोलाचे ठरेल, अशी भावना सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
-----
कोट
२०२० पासून भारतात अनिवार्य करण्यात आलेल्या BS-VI मानकांमुळे वाहनांचे प्रदूषण लक्षणीयरित्या कमी होण्यास मदत होत आहे. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांना या मानकांच्या विविध तांत्रिक पैलूंचे व्यावहारिक ज्ञान मिळेल.
- डॉ. महेश भागवत, प्राचार्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FASTag Renewal Process : 1 एप्रिलपासून महागणार FASTag वार्षिक पास; आत्ताच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, पाहा सोपी ऑनलाइन पद्धत

LPG Gas : गॅस टंचाईचा मासेमारी क्षेत्राला फटका; बर्फ उत्पादनावर परिणाम, नौका जेटीवर उभ्या

Latest Marathi Update : उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट

श्रीदेवी यांचा जाच करायची सासू, प्रेग्नेंट असताना पोटावर मारलेला बुक्का, घर फोडणारी बाई म्हणून मारायची टोमणे

एसटी बँकेच्या वादाची परंपरा कायम, गोडसेचा अखंड भारताचे विधाते म्हणून उल्लेख; अनेकांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT