कोकण

तळागाळातील शेवटच्या माणसांना न्याय मिळायला हवा

CD

rat१६p४.jpg-
३११६६
लांजा ः उच्च न्यायालयाचे न्यायाधीश माधव जामदार आणि रत्नागिरीचे जिल्हा सत्र न्यायाधीश विनोद जाधव यांचे हस्ते भाकर सेवा संस्थेला मत्स्य विभागाकडून २० लाखाचा धनादेश देण्यात आला.
-------------
शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवा
पालक न्यायमूर्ती माधव जामदार ; लांजा येथे विधी सेवा महाशिबिर
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १६ः समाजातील प्रत्येक नागरिकाला आणि तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहचायला हवा. संविधानाने जे अधिकार बहाल केलेले आहेत ते सन्मानाने मिळायला हवेत, असे प्रतिपादन पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांनी केले.
लांजा येथील श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजना महामेळाव्यात ते बोलत होते. याचे आयोजन नवी दिल्ली येथील राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि लांजा तालुका वकील संघ यांच्यावतीने केले होते. मेळाव्याचे उद्‍घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती जामदार यांच्या हस्ते आम्रवृक्षाला पाणी देऊन झाले. या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विनोद जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र पाटील, लांजा तालुका वकील संघाचे अध्यक्ष सदानंद गांगण, पोलिस उपअधीक्षक सुरेश कदम, रत्नागिरी वकील संघाचे अध्यक्ष विलास पाटणे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी पालक न्यायमूर्ती जामदार म्हणाले, हा महामेळावा समाजातील शेवटच्या माणसासाठी आहे. तळागळातील माणसांचा कार्यक्रम आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा समाजातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत या महामेळाव्यामधून पोहचवावा. संविधानाने जे अधिकार बहाल केले आहेत ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत सन्मानाने मिळायला हवेत. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव म्हणाले, सामाजिक न्यायासाठी एक पाऊल पुढे टाकून हा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. सर्व योजनांची माहिती एकाच जागी कशा मिळेल यासाठी या मेळाव्यातून प्रयत्न होणार आहेत.

चौकट
महिला सक्षमीकरणाला महत्व
ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना विशेषत: दिव्यांग महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्य फोकस ठेवला जातो. त्यासाठी शिबिरे घेतली जातात. महिला सक्षमीकरणासाठी उमेदतर्फे सरसचे आयोजन केले जाते. त्यामध्ये राज्याबाहेरसुद्धा रत्नागिरीच्या स्टॉलना मागणी असते. रस शिरवाळे, पानगा, आंबोळी, घावण याला राज्याबाहेरही मागणी आहे. सिंधुरत्न समृद्ध योजनेतून टुरिस्ट व्हॅल, हाऊसबोटी महिला प्रभागसंघांना देण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा योजनादेखील चालवण्यासाठी महिलांना देण्यात आलेली आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे यांनी सांगितले.

------
चौकट
एचपीव्ही लस देण्यासाठी पुढाकार घ्या
जिल्हा नियोजन समिती निधीच्या माध्यमातून ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी राज्यात सर्वप्रथम रत्नागिरी जिल्ह्यात एचपीव्ही लस देण्यात येत आहे. आज अखेर १० हजार मुलींना ही लस दिली आहे. एकाही मुलीला याचा त्रास झालेला नाही. राज्य शासनामार्फत जिल्ह्यातील मुलींना सध्या ही लस देण्यात येत आहे. ती मुलींना देण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन रानडे यांनी आवर्जून केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : राजस्थान रॉयल्सची साथ सोडली कारण... ! संजू सॅमसननं मन मोकळं केलं; म्हणाला, त्यांच्याविरुद्ध खेळताना भावना...

गर्भवतींसाठी ‘अनॉमली स्कॅन’ अनिवार्य! राज्यभरातील रुग्णालयांना सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश

Mumbai News: एल्फिन्स्टन पूलबधितांना मिळणार बदलून घरे, म्हाडाकडून आणखी १२ घरांचा शोध सुरू

Dhule News : सवलत हवीये? मग खिशात ठेवा 'हे' स्मार्ट कार्ड; एसटी महामंडळाचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय

Satara LPG Shortage: एलपीजीअभावी साताऱ्यातील उद्योग ठप्प! कामगारांवर उपासमारीची वेळ; उद्योजकांसमोर खर्च वाढ व तांत्रिक अडचणींचे संकट..

SCROLL FOR NEXT