कोकण

''सहकार स्वरूपा'' आत्मकथेचे आज प्रकाशन

CD

‘सहकार स्वरूपा’ आत्मकथेचा आज प्रकाशन सोहळा
ॲड. दीपक पटवर्धन यांचे पुस्तक; डॉ. निरगुडकर यांचे व्याख्यान
रत्नागिरी, ता. १६ ः रत्नागिरीतील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व ॲड. दीपक पटवर्धन यांच्या ''सहकार स्वरूपा'' या आत्मकथेचा प्रकाशन सोहळा मंगळवारी (ता. १७) आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने विचारवंत आणि चतुरस्त्र वक्ते डॉ. उदय निरगुडकर रत्नागिरीकरांशी संवाद साधणार असून, त्यांच्या प्रभावी विचारांची मेजवानी ऐकण्याची संधी मिळणार आहे.
हा कार्यक्रम मंगळवारी (ता. १७) सायंकाळी ६.१५ वाजता रत्नागिरीतील स्वयंवर मंगल कार्यालयात होणार आहे. ‘सहकार स्वरूपा’ हे पुस्तक प्रसिद्ध अशा राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. या आत्मकथेचे शब्दांकन सुमेध वडावाला यांनी केले असून, यामध्ये ॲड. दीपक पटवर्धन यांचा सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ प्रवास, विविध संस्थांमधील अनुभव आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची रोचक माहिती वाचकांना उपलब्ध होणार आहे.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निरगुडकर हे उपस्थित राहणार आहेत. डॉ. निरगुडकर हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरील त्यांच्या सखोल अभ्यासासाठी ओळखले जातात. अनेक दिवसांनंतर त्यांचे व्याख्यान रत्नागिरीत होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे उपाध्यक्ष माधव गोगटे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

IPL 2026 Marathi News : राजस्थान रॉयल्सची साथ सोडली कारण... ! संजू सॅमसननं मन मोकळं केलं; म्हणाला, त्यांच्याविरुद्ध खेळताना भावना...

गर्भवतींसाठी ‘अनॉमली स्कॅन’ अनिवार्य! राज्यभरातील रुग्णालयांना सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश

Pune Crime: पवित्र नात्याला काळीमा! सख्ख्या चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; लोणी काळभोर परिसरातील संतापजनक घटना, आरोपीला अटक..

Mumbai News: एल्फिन्स्टन पूलबधितांना मिळणार बदलून घरे, म्हाडाकडून आणखी १२ घरांचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT