31415
सामाजिक ऐक्याची परंपरा कायम राखा
जिल्हाधिकारी धोडमिसे : सण, उत्सवांसाठी शांतता समितीची बैठक
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १७ : जिल्ह्यातील सण-उत्सव सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन आनंदाने साजरे करण्याची मोठी परंपरा आहे. या काळात जिल्ह्यात सलोख्याचे आणि शांततेचे वातावरण टिकून राहणे अत्यंत आवश्यक असून, त्यासाठी सर्व समाजघटकांमध्ये संवाद वाढणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेहमीच सामाजिक ऐक्याचे वातावरण राहिले असून, प्रशासनाला सर्व नागरिकांचे सहकार्य लाभले आहे. आगामी सण-उत्सवांच्या काळातही नागरिकांनी संयम आणि जबाबदारीची भूमिका घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
जिल्ह्यातील आगामी सण-उत्सव शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावेत, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सलोखा आणि नागरिकांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत जिल्हा शांतता समितीच्या सदस्यांनीही आपली मते मांडली. समाजात शांततेचे वातावरण कायम राखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावरही चर्चा झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, तसेच जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाचे अधिकारी आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
-----
अफवा पसरू नयेत यासाठी सतर्क राहा!
पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर म्हणाले, ‘सण-उत्सवाच्या काळात सर्वांनी सामाजिक एकोपा जपणे गरजेचे आहे. समाज माध्यमांवरून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. अशा अफवा पसरू नयेत, यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे. कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तत्काळ पोलिस प्रशासनाला माहिती द्यावी.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.