

Ishan Kishan-Abhishek Sharma SRH Exit Rumours Here’s The Truth.jpg
esakal
did SRH players refuse to play after Abrar Ahmed signing: सनरायझर्स फ्रँचायझीचा मालकी हक्क असलेल्या सनरायझर्स लीड्स संघाने पाकिस्तानी खेळाडू अबरार अहमद याला करारबद्ध केल्यापासून वादाला तोंड फुटले आहे. काव्या मारन मालकीण असलेल्या फ्रँचायझीने द हंड्रेड लीगसाठी अबरारला २.३४ कोटींत करारबद्ध केले. यावरून सोशल मीडियावर #BoycottSRH अशी मोहिम राबवण्यात आली. महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांनी जोरदार टीका केली. त्यात आता इशान किशन ( Ishan Kishan) आणि अभिषेक शर्मा ( Abhishek Sharma) यांनी SRH कडून आयपीएल २०२६ मध्ये खेळण्यास नकार दिल्याचे वृत्त समोर आले आहे. पण, खरंच इशानने काव्या मारनचा निषेध नोंदवला का? त्याने आणि अभिषेकने असा टोकाचा निर्णय घेतलाय का? चला जाणून घेऊयात...