कोकण

गुणवंतांना केंद्रप्रमुखपदी संधी द्या; ‘टीईटी’त अडकू नका

CD

गुणवंतांना केंद्रप्रमुखपदी संधी
द्या; ‘टीईटी’त अडकू नका

प्राथमिक शिक्षक समितीची मागणी

सिंधुदुर्गनगरी, ता. १६ : परीक्षेत गुणवत्ता सिद्ध केली आहे, त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती देण्यात यावी. ‘टीईटी’ पात्रतेच्या फेऱ्यात अडकवू नये, अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा शाखेने केली आहे.
केंद्रप्रमुख पदासाठी फेब्रुवारीमध्ये शासनामार्फत विशेष परीक्षा घेण्यात आली. याचा निकाल १३ तारखेला ऑनलाईन जाहीर करण्यात आला. ज्यावेळी या परीक्षेचे अर्ज भरून घेण्यात आले, त्या वेळी ‘टीईटी’ पात्रतेबाबत कोणतीही स्पष्ट अट किंवा शिफारस नव्हती. त्यामुळे ही परीक्षा टीईटी उत्तीर्ण असलेल्या आणि नसलेल्या अशा सर्व पात्र शिक्षकांनी दिली. या परीक्षेचा सखोल अभ्यास करून अनेक शिक्षकांनी जिल्हा गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र, आता ‘टीईटी’ उत्तीर्ण नसल्याने अशा गुणवंत शिक्षकांची केंद्रप्रमुख पदाची संधी हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना ‘टीईटी’ उत्तीर्ण होण्याच्या अटीवर ‘आगाऊ नियुक्ती’ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा सिंधुदुर्गने केली आहे.
सध्या परीक्षा परिषदेने लिंकद्वारे केवळ टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची माहिती मागवली आहे. यामुळे गुणवत्ता यादीत येऊनही केवळ ‘टीईटी’ प्रमाणपत्राअभावी शिक्षकांवर अन्याय होण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाच्या पूर्वीच्या धोरणाप्रमाणे, ज्या शिक्षकांनी परीक्षेत गुणवत्ता सिद्ध केली आहे, त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती देण्यात यावी. तसेच, न्यायालयाच्या निर्णयानुसार निश्चित केलेल्या कालावधीत टीईटी उत्तीर्ण होण्याची सवलत देऊन त्यांना नेमणूक द्यावी. नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार या शिक्षकांना न्याय मिळावा, अशी विनंती शिक्षक समितीने शासन व प्रशासन स्तरावर केली आहे.

मुलगा दत्तक घेणाऱ्या महिलांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणं असंवैधानिक, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय...

Jalgaon News : झाडांची कत्तल अन् तलावाची हानी! मेहरूण तलाव वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले

Dombivli: क्रिकेट खेळताना चिमुकल्यावर काळ ओढवला; हसत्याखेळत्या कुटुंबाची स्वप्न क्षणात उद्ध्वस्त, मुंबईत नेमकं काय घडलं?

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत! हे शेअर्स चमकले; मात्र मोठ्या IPO ला ब्रेक का?

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देण्याची खासदारांची मागणी

SCROLL FOR NEXT