कोकण

ॲड. सरोदे यांचे आरोप चुकीचे

CD

31479

ॲड. सरोदे यांचे आरोप चुकीचे

ॲड. परिमल नाईक : उमेदवाराला विरोधासाठीच खटाटोप

सावंतवाडी, ता. १७ : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सावंतवाडीत आलेल्या ॲड. असीम सरोदे यांनी सावंतवाडी बार असोसिएशन आणि जिल्ह्यातील वकील सभासदांवर केलेले आरोप पूर्णतः निराधार, खोडसाळ आणि दिशाभूल करणारे आहेत, अशी टीका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांनी केली आहे. सरोदे यांचा हा खटाटोप केवळ जिल्ह्यातील सर्वसंमतीच्या उमेदवाराला विरोध करण्यासाठी असल्याचा दावाही त्यांनी केला.
येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बालाजी रणशूर, ज्येष्ठ विधिज्ञ संदीप निंबाळकर, ॲड. श्यामराव सावंत, ॲड. अमोल कविटकर, ॲड. गोविंद बांदेकर, ॲड. संकेत नेवगी, ॲड. राहुल मडगावकर, ॲड. स्वप्नील कोरगावकर, ॲड. सुशील राजगे, ॲड. अंकुश ठाकूर, ॲड. सुमित सुकी, ॲड. प्रतीक्षा भिसे, ॲड. सिद्धी परब आदी उपस्थित होते.
ॲड. नाईक पुढे म्हणाले, ‘जिल्ह्यातील एका वकिलांनी ॲड. असीम सरोदे आणि निवृत्त न्यायमूर्ती नलावडे यांच्या ‘मतदारांची भूमिका’ या विषयावरील व्याख्यानासाठी सावंतवाडी बार असोसिएशनकडे तोंडी परवानगी मागितली होती. मात्र, बार असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाचा कोणताही निर्णय होण्यापूर्वीच संबंधित वकिलांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमाची माहिती प्रसिद्ध केली. सरोदे यांचा मूळ हेतू प्रबोधन नसून निवडणुकीत विशिष्ट उमेदवाराचा प्रचार करणे हा असल्याचे लक्षात आल्यावर, बार रूममध्ये अशा कार्यक्रमाला परवानगी नाकारली.’
यावेळी सावंतवाडी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. रणशूर म्हणाले, ‘ॲड. असीम सरोदे यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला त्यांच्या समितीने अधिकृत परवानगी दिलेली नव्हती. ते न्यायालयात उपस्थित झाल्यानंतर समितीने किंवा कोणत्याही सदस्याने त्यांच्या न्यायालयीन कामकाजाला कोणताही अटकाव केला नाही.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Crisis: महाराष्ट्रात इंधन संकटाचा स्फोट! पेट्रोल-डिझेलसाठी लांब रांगा, अनेक पंपावर ‘नो स्टॉक’ बोर्ड, वाहनचालकांचे हाल

IPL 2026, SRH vs KKR: पॅट कमिन्सने टॉस जिंकला, पण नितीश रेड्डीला का बाहेर बसवला? कोलकाता संघातही झाला बदल; पाहा Playing XI

Hasan Mushrif Gokul Milk Trap : अजित दादा गेले मंत्री मुश्रीफ अडकले चक्रव्यूहात, ‘गोकुळ’मधील किरकोळ चुका बनल्या गंभीर ; ईडी पुन्हा लागणार मागे?

CSK: मुंबईला त्यांच्याच भाषेत उत्तर! CSK ने रचला इतिहास जो कोणत्याही टीमला जमला नाही; 'या' बाबतीत चेन्नई ठरली नंबर १

Nagpur News: बारावीच्या परीक्षेत ‘मास कॉपी’; वर्धा, गोंदिया जिल्ह्यातील २४३ विद्यार्थ्यांवर कारवाई

SCROLL FOR NEXT