

Chennai’s Record Against Mumbai
sakal
Chennai’s Record Against Mumbai: इंडियन प्रीमियर लीग २०२६(IPL) चा ४४ वा सामना काल (२ मे) रोजी चेन्नई सुपर किंग्स(Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळला गेला. या हंगामातील हा या दोन्ही संघांमधील दुसरा सामना होता. २०२६ मधील दोन्ही सामन्यांत चेन्नईने मुंबईला पराभूत केले आहे. कालच्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर ८ गडी राखून विजय मिळवला. चेन्नई आणि मुंबईमधील हा सामना चेपॉकच्या चिदंबरम मैदानावर खेळला गेला. या हंगामात चेन्नईचा खेळ कधी चांगला तर कधी खराब असा मिश्र राहिला आहे. दरम्यान, या सामन्यात चेन्नईने एक विशेष कामगिरी केली आहे.