कोकण

दूरस्थ शिक्षण केंद्रामार्फत प्रवेश प्रक्रिया

CD

संस्कृत शिक्षणासाठी नवे दरवाजे खुले
अध्ययन उपकेंद्रात ; अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या येथील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षणकेंद्रामार्फत प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय ज्ञानपरंपरेचा वैभवशाली वारसा आणि आधुनिक शैक्षणिक दृष्टिकोन यांचा संगम साधणारे विविध पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले आहेत.
संस्कृत भाषा, योगशास्त्र आणि भारतीय तत्त्वज्ञान यांविषयी वाढती आवड लक्षात घेता एमए संस्कृत व एमए योगशास्त्र हे दोन वर्षांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच बीए संस्कृत आणि बीए योगशास्त्र हे तीन वर्षांचे पदवी अभ्यासक्रम राबवण्यात येत आहेत. बारावी उत्तीर्ण तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी आहे. याशिवाय संस्कृत आगम, कर्मकांड, ज्योतिष, वास्तूशास्त्र, वैदिक गणित, भारतीय तत्त्वज्ञान, कीर्तनशास्त्र, संस्कृत पत्रकारिता अशा विविध विषयांतील एक वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक ठरणार आहेत. सहा महिन्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये स्पोकन संस्कृत, संस्कृत लेखन, भगवद्‍गीता, अद्वैत वेदांत आदींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT