स्वामी समर्थ प्रकट
दिन उत्सव उद्यापासून
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील श्री स्वामी समर्थ मठात स्वामींच्या प्रकटदिनानिमित्त विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २१ मार्च या कालावधीत हा उत्सव रंगणार आहे. १९ मार्चला सायंकाळी ५.३० वा. मठात ‘स्वामीनाम ज्योत’ प्रज्वलन करून उत्सवाचा प्रारंभ होईल. २०ला स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त पहाटे ५.३० वा. काकडा आरती, सकाळी ७ वा. स्वामी समर्थ पूजन आणि स्वामींच्या पादुकांवर अभिषेक, १० वा. सामुदायिक नामजप, १०.३० वा. श्री स्वामी नामजप यज्ञ, दुपारी १२ वा. सद्गुरू प्रवचन, १२.३० वा. महानैवेद्य अर्पण आणि महाआरती, १ वा. महाप्रसाद वितरण, ७ वा. मठाच्या प्रांगणात पालखी प्रदक्षिणा होईल. ८ वा. नित्याची आरती, २१ मार्चला दुपारी १२ वा. महानैवेद्य, महाआरती आणि महाप्रसाद होईल.