कोकण

गाऱ्हाणे घालून रत्नागिरीत उभारणार ‘साहित्यिक गुढी

CD

-rat१७p२६.jpg-
P२६O३१५२१
जनसेवा ग्रंथालय
--------
साहित्यिक गुढीने नवचैतन्याची हाक
जनसेवा ग्रंथालयाचा उपक्रम; साहित्य चळवळीला बळ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : मराठी साहित्यामध्ये चैतन्य यावे, साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी आणि कोकणातून नवे साहित्यिक घडावे, या उद्देशाने लक्ष्मीचौक येथील जनसेवा ग्रंथालयातर्फे अवघ्या साहित्यविश्वात औत्सुक्याचा विषय ठरलेली ‘साहित्यिक गुढी’ उभारण्यात येणार आहे. या वेळी संगमेश्वरी बोलीभाषेतील खणखणीत आवाजातील गाऱ्हाणे साहित्यातील अग्रणींना घालण्यात येणार आहे. पाडव्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी (ता. १८) सकाळी १० वा. प्रांगणात ही गुढी उभारली जाणार आहे.
गुढीचे खास आकर्षण असलेल्या ‘साहित्यपताका’ लावण्यात येतील. जनसेवाचे वाचक श्रीनिवास सरपोतदार यांच्या संकल्पनेतून दरवर्षी विविध विषयांवर साहित्यपताका तयार केल्या आहेत. शालिवाहनाच्या पराक्रमाच्या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहनाच्या नावाने नवीन कालगणना चैत्र शुद्ध प्रतिप्रदेला ‘शालिवाहन शक’ अशी सुरू करण्यात आली. ज्याने विजय मिळवला तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळवला ते ‘शक’ अशा दोघांचाही अंतर्भाव ‘शालिवाहन शक’ या संज्ञेमध्ये झाला आहे. यानिमित्त अवघ्या महाराष्ट्रात गुढी उभारली जाते. नव्याची सुरुवात आणि नव्याची निर्मिती असा या सणाचा सोपा अर्थ आहे.
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात् गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. यानिमित्त गेली अनेक वर्षे जनसेवा ग्रंथालयात साहित्यिक गुढी उभारली जात आहे. कोकणच्या साहित्यनिर्मितीला आलेली मरगळ दूर होऊन सकस साहित्यनिर्मिती व्हावी, या उद्देशाने ही साहित्यिक गुढी उभारण्यात येते. त्या अनुषंगाने मराठी साहित्यविश्वात नव्याची निर्मिती व्हावी अर्थात् वाचन आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी नेहमीच कटिबद्ध असलेल्या जनसेवा ग्रंथालयातर्फे ही साहित्यिक गुढी उभारण्यात येणार आहे. साहित्यविश्वातील हा एकमेव आणि आगळावेगळा असा उपक्रम आहे. या कार्यक्रमाला नवोदित लेखक, वाचक, साहित्यिक, सभासद, विद्यार्थी, रत्नागिरीकर यांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन जनसेवा ग्रंथालयातर्फे करण्यात आले आहे.
----------
साहित्यपुरुषांना गाऱ्हाणे
पुस्तकांची माळ असलेली साहित्यिक गुढी मान्यवरांच्या हस्ते उभारण्यात येईल. त्यानंतर मान्यवर, नवोदित लेखक-कवी यांच्या हस्ते गुढीपूजा व ग्रंथपूजा होईल. गुढीपूजा झाल्यानंतर कोकणातील साहित्य चळवळीला ऊर्जितावस्था लाभावी, नवनवे साहित्यिक निर्माण होऊन जास्तीत जास्त साहित्यनिर्मिती व्हावी, या उद्देशाने गाऱ्हाणे घालण्यात येईल. त्यानंतर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‍घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FACT CHECK : इशान किशन, अभिषेक शर्मा यांचा SRH कडून IPL 2026 खेळण्यास नकार? काव्या मारनचा नोंदवला निषेध... जाणून घ्या सत्य

MS Dhoni त्याची आवडती ७ क्रमांकाची जर्सी सोडणार? फेसबूक पोस्टने खळबळ, रवींद्र जडेजाच्या जाण्याने नाराज असल्याची चर्चा

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा का साजरा केला जातो माहीत आहे? जाणून घ्या सणाचा इतिहास आणि महत्त्व

Latest Marathi News Live Update : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

"सगळा एडिटचा खेळ" करणसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर प्राजक्ताने सोडलं मौन ; "आमच्या दोघांमध्ये.."

SCROLL FOR NEXT