रत्नागिरीत मंगळवारी
रोजगार मेळावा
रत्नागिरी ः जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा मंगळवारी २४ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित केला आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा मेळावा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाचणे रोड येथे होईल. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीकृत उमेदवारांनी आपले प्रोफाईल अद्ययावत ठेवावे. ज्या उमेदवारांनी आधीच नोंदणी केली आहे त्यांनी आपल्या युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करून मेळाव्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
चिपळूण अर्बनच्या
कार्यालयाचे आज उद्घाटन
चिपळूण : चिपळूण अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालय आणि मुख्य शाखेचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुरूवारी (ता. १९) पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल, उपाध्यक्ष धनंजय खातू, मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार सूर्यवंशी यांच्यासह सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत.
अलोरेत उद्या मोफत
वैद्यकीय शिबिर
चिपळूण : तालुक्यातील अलोरे येथे कोकणचे गरीब नवाज शहानूर बाबा चिस्ती (र. अ.) सरकार (मिनी अजमेर) यांचा उरूस शुक्रवारी (ता. २०) भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. या उरुसानिमित्त विविध वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फिजिओथेरपी (भौतिकोपचार) तज्ज्ञ डॉ. करणकुमार कररा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच दंतचिकित्सा क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. श्रीजीत पाटील उपस्थित राहून सेवा देणार आहेत. परिसरातील सर्व नागरिकांनी या मोफत वैद्यकीय शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.