31758
दिविजा आश्रमात अन्नदान
तळेरे : शिवसेना आमदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दिविजा वृद्धाश्रम, असलदे येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद वायंगणकर यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपनेते संजय आग्रे, कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, तालुकाध्यक्ष दामोदर सावंत, युवा जिल्हाप्रमुख जयेश धुमाळे, कणकवली उपतालुका प्रमुख संजय नकाशे, जाणवली जिल्हा परिषद सदस्य श्रीमती तांबे, कणकवली तालुका महिला आघाडी प्रमुख श्रीमती टेमकर, दिविजा आश्रमाचे व्यवस्थापक संदेश शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
.....................
31759
प्रज्ञाशोध परीक्षेत वेदा जाधव प्रथम
बांदा ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांदा पानवळ या शाळेने गतवर्षी अध्यापन निर्मितीमध्ये महाराष्ट्रात प्रथम येऊन शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण पुणे येथे संचालकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. शैक्षणिक स्पर्धा परीक्षा गुरुकुल प्रज्ञा शोध तसेच सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च या दोन्ही परीक्षेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्याच्या निवड यादीत नोंद झाली. गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत पहिलीतील वेदा जाधव जिल्ह्यात प्रथम तर राज्यात सहावी, निरांत नांदोडकर तालुक्यात नववा, दुसरीतील आर्यन साईल जिल्ह्यात सातवा तर राज्यात बारावा, मुग्धा पेळपकर जिल्ह्यात आठवी तर राज्यात तेरावी आली. सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये आर्यन साईल याने सुवर्ण, मुग्धा पेळपकर हिने रौप्यपदक मिळविले. परी सावंत, तानाजी वरक यांनीही यश प्राप्त केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबदद्ल शाळा व्यवस्थापन समितीने अभिनंदन केले. मुख्याध्यापक मनोहर परब, शिक्षिका सुनिता कदम यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.