‘नवोदय’ परीक्षेत रायपाटण शाळेचे सुयश
राजापूर : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत रायपाटण केंद्र शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले. शाळेतील आर्यन नवरे, साई गांगण आणि तनिष्का ऐनारकर या तीन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. आर्यन नवरे याने ९७.५० टक्के गुण मिळवत विशेष यश मिळवले असून, साई आणि तनिष्का यांनी प्रत्येकी ९२.५० टक्के गुण मिळवले. शाळेतील एकूण आठ विद्यार्थी नवोदय परीक्षेस बसले होते आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना मुख्य मार्गदर्शक शिक्षिका थरवळ तसेच सर्व शिक्षक व पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
राजापूरमध्ये २४ ला ‘नशामुक्त’ची सांगता
राजापूर : भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या सहयोगाने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे कोकण विभागात राबवण्यात आलेल्या नशामुक्त भारत अभियानाची सांगता मंगळवारी (ता. २४) राजापूर येथे होणार आहे. अभियानाचा प्रारंभ सावंतवाडी तालुक्यात झाला असून, चलचित्र, पत्रके व मार्गदर्शनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण, कणकवली, वैभववाडी तसेच राजापूर व लांजा तालुक्यांत शाळा व शासकीय कार्यालयांना भेटी देत व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. राजापूर तालुक्यातील शाळा व एसटी आगारात विद्यार्थी व नागरिकांमध्ये जनजागृती केली. या वेळी डॉ. भारती बेहेन, बी. के. पुरुषोत्तम भाई व बी. के. प्रिया बहेन यांनी अभियानाची माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.