लांजा तालुका मराठा समाजाचा
रविवारी मुंबईत भव्य मेळावा
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १९ ः लांजा तालुका मराठा संघाच्यावतीने मुंबईत स्थायिक असलेल्या लांजा तालुक्यातील मराठा समाजबांधवांचा भव्य मेळावा रविवारी २२ मार्च रोजी सकाळी १० वाजता भांडुप येथील पराग विद्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
१९८३ला स्थापन झालेल्या या संघाने दरवर्षी शिवजयंती आणि विद्यार्थी गुणगौरवसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. लांजा तालुक्यातील अनेक बांधव नोकरी आणि व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक आहेत; मात्र आपल्या हक्काचे एक सामाजिक केंद्र लांजात असावे, अशी भावना समाजाकडून व्यक्त होत आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सुसज्ज वस्तीगृह, मराठा उद्योगकेंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा अशा विविध सोयींनीयुक्त ‘बहुउद्देशीय लांजा तालुका मराठा भवन’ उभारण्याचा संकल्प संघाने सोडला आहे. या महत्त्वाकांक्षी वास्तूच्या निर्मितीचे निश्चित धोरण ठरवण्यासाठी आणि मुंबईस्थित मराठी व्यावसायिक, उद्योजक व समाजबांधवांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात मराठा भवनाच्या उभारणीसाठी पुढील दिशा निश्चित केली जाणार असून, मुंबईतील लांजा तालुका मराठा समाजबांधवांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष सुभाष राणे, सरचिटणीस विजय पाटोळे आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.