swt198.jpg
31946
चौके-मांडखोल : येथील प्राथमिक शाळेत ''गुढीपाडवा, प्रवेश वाढवा'' उपक्रम गुरुवारी झाला.
‘गुढीपाडवा, प्रवेश वाढवा’
चौके-मांडखोलमध्ये उपक्रम : पालकांचाही प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १९ : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौके-मांडखोल येथे ‘गुढी पाडवा, प्रवेश वाढवा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला.
सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलांचे प्रवेशाचे प्रमाण कमी होत असल्याचे चित्र आहे. मे-जूनपर्यंत वाट पाहिल्यास मुले इतर शाळांमध्ये दाखल होतात. ही बाब लक्षात घेऊन, आगामी शैक्षणिक वर्षातील पटसंख्या वाढवण्यासाठी शाळेने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पहिलीतील मुलांचे प्रवेश निश्चित केले. यावेळी मराठी नववर्षाचे स्वागत शाळेत पारंपरिक पद्धतीने गुढ्या उभारून करण्यात आले.
या उपक्रमात शाळेचे पालक, ग्रामस्थ आणि शालेय व्यवस्थापन समितीने उत्स्फूर्त सहभाग घेतला. शाळेत गुणवत्तेसोबतच विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थी संख्या वाढवणे आणि मुलांना आनंददायी, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमाचे नेटके नियोजन शाळेचे उपक्रमशील शिक्षक सुषण ढवण व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक दीपक गोसावी यांनी केले. या कल्पक व प्रबोधनात्मक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.